सैन्य दलाचे शूर जवान भास्कर गोरठकर यांचा वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने घुंगराळा येथे हृदय सत्कार.
नायगाव दि 27- भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावणारे रुई तालुका नायगाव येथील सुरक्षा बल कॉन्स्टेबल भास्कर गंगाधर गोरठकर यांना युद्धामध्ये कर्तव्य बजावत असताना हाताला व पायाला गोळ्या लागून त्यांना अपंगत्व आले आहे, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ताम्रपट व रोख रक्कम ३४ लक्ष रुपयाचे बक्षीस नांदेड जिल्ह्याचे मा.पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना प्रदान करण्यात आले.

गोरठकर यांच्या देशसेवे बाबत ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने भास्कर गोरठकर यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

आपल्या परिसरातील भारतीय जवानाने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे.गोरठकर यांचा पराक्रम आपल्या परिसरातील सर्वासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, सुगावे पाटील परिवार व समस्त घुंगराळा गावातील गावकरी सदैव तुमच्या पाठीशी राहतील, अशी प्रतिक्रया या वेळी वसंत सुगावे पाटील यांनी दिली.

या वेळी से. नि.विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब, बालाजीराव हाळदेवाड, संभाजीराव तुरटवाड, से. नि.विस्तार अधिकारी मातावाड साहेब, शंकर मामा भैराट, अच्युत पा.ढगे, लोहा येथील मा.पंचायत समिती सदस्य प्रल्हाद पा. फाजगे, मा.उपसरपंच शिवाजी पा.ढगे, गोविंदा पा.शिंदे, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य गोविंदराव पांचाळ, व्यंकटराव कंचलवाड, उद्योजक साईनाथ पा.ढगे ,संजय गजभारे, सुग्रीव सूर्यवंशी तसेच या वेळी घुंगराळा, वंजारवाडी, रुई येथील नागरिक उपस्थित होते


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि