मुलगी पाहण्यासाठी आले..आणि नवरीला सोबतच घेऊन गेले,..पारंपारिक रूढींना डावलून सोनखेड येथे अनोखा विवाह


सोनखेड दि 23- विवाहोच्छूक तरुण घरच्या प्रमुख मंडळीसह मुलगी पाहण्यासाठी आला..तिला पाहताच त्याला ओळखीची खूण पटली..तीनेही आपल्या आयुष्याच्या जोडीदार ओळखला..आणि मने जुळल्याची खात्री होताच दोन्हीकडच्या ज्येष्ठ मंडळींनी

पारंपारिक रूढींना फाटा देत शुभस्य शीघ्रम चा पवित्रा घेतला आणि त्या दोघांचा अनोखा शुभविवाह लगेच अत्यंत मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याची मंगल व आदर्श घटना सोनखेड येथे घडून आली

परभणी तालुक्यातील टाकळी येथील प्रतिष्ठित रहिवासी प्रकाशराव देशमुख यांनी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पवन यांच्या विवाहासाठी नुकतीच चाचपणी सुरू केली होती,याच निमित्ताने हे कुटुंब सोनखेड येथील दिवंगत प्रतिष्ठित नागरिक कै.नागोराव जगन्नाथ मोरे यांची द्वितीय कन्या चि. सौ.कां.सविता हिला पाहण्यासाठी गावात दि 21 रोजी दुपारच्या सुमारास दाखल झाले,मुलाला मुलगी पसंत आली, आणि मुलीनेही आपला होकार दिला, दोन्हीकडच्या ज्येष्ठ मंडळीने दोघांचाही होकार कळताच शुभस्य शीघ्रम चा पवित्रा घेतला आणि पारंपारिक रूढी,निष्कारण विलंब,अनावश्यक खर्चाला खंबीरपणे फाटा देत या दोघांचे शुभमंगल लगेचच उरकून घेण्याचा परस्पर सहमतीने निर्णय घेतला.आणि अवघ्या काही तासातच रात्री आठ वाजता सोनखेड येथील दगडगाव रस्त्यावरील भैरवनाथ मंदिरात या जोडप्याचा शुभविवाह संपन्न झाला,

सध्या करोना महामारी मुळे मंगल कार्यांना मोठी अडचण उद्भवत आहे,आयोजकांना आणि निमंत्रितांनाही मंगल कार्य ही बाब धास्तीचीच वाटू लागली आहे,या पार्श्वभूमीवर या दोन्ही कुटुंबांनी मानपान,रुसवे फुगवे, गाजावाजा,पारंपारिक रीतिरिवाज,निमंत्रणे,खर्च,आहेर, देणेघेणे असा लवाजमा,अशा अनावश्यक बाबींना फाटा देऊन वधू वराचे शुभमंगल साजरे केले व सर्वांसमोर अनुकरणीय आदर्श निर्माण केला,चि पवन व चि सौ कां सविता यांच्या घडून आलेल्या या अनोख्या शुभ विवाहाचे परिसरात मनोभावे कौतुक होत असून अनेकांनी या नवदाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि