मोर इकळी येथे अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाची चौकशी व जे. सी.बी.वर कार्यवाही करण्याची मागणी

दि 12 मार्च पासून आमरण उपोषणाचा इशारा

**************************************************

नायगाव दि 09-नायगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी 02 मार्च रोजी मौजे ईकळीमोर येथे धाड टाकून अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई केली पण याच अवैध मुरूम उत्खननात सामील असलेल्या जे.सी बी ला मात्र मोकळे सोडले,इतर वाहनांप्रमाणेच सदर जेसीबी जप्त करुन संबंधितावर दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा दि.12 मार्च रोजी सकाळी 11.00 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते सूर्यकार यानि निवेदनाद्वारे दिला आहे.

इंकळीमांर ता नायगाव येथील गट क्र. 537 येथील 200 ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी काढण्यात आली, प्रत्यक्षात जे.सी.बी , 1 हायवा, 2 ट्रॅक्टर द्वारे 800 ते I000 ब्रास अतिरिक्त मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे.

या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दिनांक 02 मार्च रोजी वरिष्ठ अधिका-यांनी उत्खनन सुरू असताना धाडी टाकून कारवाई केली, या कारवाईत घटनास्थळी असलेली एक हायवा, दोन ट्रॅक्टर अशी वाहने जप्त करण्यात आली,

पण प्रत्यक्ष खदानित उत्खनन करत असलेल्या जे.सी.बी. कडे मात्र कृपाकटाक्ष टाकत या वाहनांची नोंद साधी पंचनाम्यातही घेतली नसल्याची तक्रारदारांचे म्हणणे आहे. सरसकट न्याय कारवाई व्हावी यासाठी त्या जे.सा.बी.चाही शोध लाऊन संबंधीतावर दंडात्मक कार्यवाही करावी,अवैध रित्या मुरुमाचे उत्खनन झालेल्या त्या गटाची इटीएस चौकशी करुन जादा उत्खनन करणाऱ्या संबंधीताकडून दंड वसुल करावा अन्यथा नाईलाजास्तव दि.12/03/2021 रोज शुक्रवारी सकाळी 11 पासून आपल्या कार्यालया पुढे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल यांची प्रशासनाने गांभिर्याने नोद घ्यावी असा इशारा साहेबराव बाबाराव सूर्यकार यांनी निवेदना द्वारे तहसीलदार नायगाव यांना दिला आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि