गडगा येथे अवैध दारु,मटका जोमात; पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत मश्गुल

नायगाव दि 30- नायगाव तालुक्यातील गडगा हे गाव चौरस्त्यावरील व अनेक गावाचा संपर्क असणारे आहे.सध्या हे गाव अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे.कोरोनामुळे सगळा जिल्हा लाॅकडाऊन असताना गडग्यात मात्र अवैध दारू विक्रीचा धंदा जोमात चालू आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या मटक्याचाही खेळ या गावात चांगलाच फोफावला आहे.. गावात ठिकठिकाणी मटका बुकीचा सुळसुळाट झाला आहे.या अवैध धंद्यात बिअर बार चालकांनीही हातभार लावत अवैध मद्यविक्री साठी दोन-तीन जणांना पुरवठ्या साठी तैनात ठेवले आहे.बारच्या जवळ थांबून दारूची,बिअरची विक्रीही धुमधडाक्यात चालू आहे.

नरसी-मुखेड राज्य मार्गावर गडगा येथे गडगा-मांजरम रस्त्यावर देशी दारू चे दुकान आहे.तसेच नरसी-मुखेड रस्त्यावर बिअर बार आहे.गडगा गाव हे दहा-पंधरा गावांच्या केंद्रस्थानी आहे.सध्या या गावात कुणीही यावे.. खुशाल अवैध धंदे सुरू करावे अशी परिस्थिती झाली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू केला तरीही या गावात मात्र खुलेआम अवैध दारू विक्री चालू आहे.

मटक्याचे बुकीही येथे उघडपणे मटका चालवित आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असतानाही दारूबंदी विभाग,पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे,लॉक डाउन,कोरोना महामारी मुळे पैदल झालेले छोटे व्यावसायिक, बेरोजगार तरूण हातावर पोट असणारे अनेक लोक या मटका, दारूच्या गर्तेत अधिकाधिक बुडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.घराघरात दररोज भांडण तंटे सुरू झाले आहेत.अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.

अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलीसच संरक्षण देत सोबत घेऊन फिरतांना दिसत आहेत.एवढेच काय तर पोलीसांच्या सेवेलाच अवैध दारू विक्रेताच तैनात असल्याचे नेहमीचे चित्र आहे ,ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना आणि जो खुलेआम अवैध धंदे करत आहे अशासोबतच पोलीस दोस्ती कशी काय करु शकतात? या प्रश्नाचे उत्तर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी शोधणे गरजेचे आहे.

दोन महीन्यापूर्वी अवैध दारू विक्रेत्यासोबत गडग्याच्या जय भवानी धाब्यावर दारुच्या नशेत झिंगतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत मांजरम बीटचा कारभार पहाणाऱ्या पो.हे.कों.डी.एस.वडजे या पोलीसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली होती.या घटनेनंतर तरी गडग्यातील अवैध धंदे बंद होतील असे गावकऱ्यांना वाटत होते परंतु तसे काहीच झाले नाही.या उलट अवैध धंद्याचे गडगा हे मुख्य केंद्र बनले आहे.जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गडगा येथील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी हातावर पोट असलेल्या महीला वर्गाने व सामाजिक कार्यकर्ते उमाकांत कोंडलवाडे यांनी पत्रकाराना बोलताना केली केली आहे.शिवाय या अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या खाकी वर्दीतील ए एस आय वाघमारे यांच्या बदलीची मागणीही केली जात असून या अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा उभा करणार असेही त्यानी सांगितले आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि