अवैध रेती वाहतुक करणारे टिप्पर महसूल पथकाने पकडले; दोन लाख पंचाऐंशी हजार दंड

नायगाव दि 24- नायगाव परिसरात रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी महसूल खात्याने विशेष पथके नेमली आहेत,यापैकी एका पथकाने दि 22 मार्च रोजी रात्री उशिरा एक अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून संबंधिताला दोन लाख पंचाऐंशी हजार दंड आकारल्याची घटना घडली

या प्रकाराने वाळू माफिया व महसूल मधील बेबनाव उघडकीस आला असला तरी नायगाव तालुक्यात अद्यापही वाळूचा रात्रीस खेळ चाले हा प्रकार एखाद्या टीव्हीच्या सिरीयल प्रमाणे रोजच सुरू असल्याचे मात्र या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

लोहा व शेजारच्या इतर तालूक्यातील अवैध वाळू उपसा करून साठा केलेली रेती नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून रात्री-बेरात्री अवैध रित्या येत आहे.अवैध रेती वाहतूकीचा सपाटाच सुरूच आहे. महसूल प्रशासनाकडून पथकांची नेमणूक केली गेली असून प्रशासनाच्या नजरेत धूळ फेकत मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान एम एच 26 बी इ 8577 हे हायवा टिपर शेळगाव छत्री ते सुजलेगाव रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करतांना मंडळ अधिकारी,तलाठी यांनी पकडला ,पुढील कारवाईसाठी हे टिप्पर पोलीस ठाण्यात जप्त करुन जवळपास दोन लाख पंचाऐंशी हजारांचा दंड लावण्यात आला आहे.

लोहा तालुक्यातील अनेक गावात रेती माफीयांचा हैदोस सुरू आहे, गोदावरी पात्रातील काळी वाळू उपसा करून टिप्परच्या साह्याने रात्रीला नायगाव तालुक्यात दाखल होत आहे,मध्यंतरी कोडगाव व येळी येथे महसूल प्रशासनाच्या अधिका-यां कहून धातुर मातुर कार्यवाही करत तराफे जाळन्यात आले होते .

त्यानंतरही वरिल काही गावात रात्र भर तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून अवैध वाळू उत्खनन मोठया प्रमाणात सुरू असल्याचे दिसुन येत आहे. कोडगाव व येळी येथे रात्र भर उत्खनन केलेली ती वाळू दुस-यां रात्री टिप्पर मध्ये भरून काहाळा मार्ग मुखेड व नायगाव तातुक्यातील गावात विक्री होत आहे .

या रात्रीच्या अवैध वाळू वाहतुकीला महसूल विभागाचा व पोलीसांचाही छुपा पाठिंबा असल्यानेच रेती माफीयां रात्र भर रेती वाहतुक करत आहेत.वरिल दोन्ही गावात गेल्या एक दिड महीण्यापासुन

हाजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन चालू असून येथून नायगाव मुखेड तालूक्यात विक्री होत आहे. वाळू भरून मारताळा काहाळा माजंरम मार्ग जात असल्याची माहिती नायगाव चे उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे व तहसीलदार गजानन शिदे यांना मिळाली माहिती मिळताच त्वरित दोन्ही अधिका- यांनी मंडळधिकारी तलाठी यांना कारवाई साठी रवाना केले,विशेष म्हणजे सदर टिप्पर चालकाला टिप्पर घेऊन नायगाव येथील तहसील कडे घेऊन चालण्याची सूचना दिली असता तो जागेवरून टिप्पर हालविण्यासही तयार होत नव्हता यावरून वाळू माफियाची हिम्मत वरचेवर वाढत असल्याचेही निष्पन्न झाले आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि