पोलिस उपनिरीक्षक भिमराव कांबळे यांच्या जागरूकतेमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर गुन्हा दाखल
नायगाव दि 13- नायगावचे पोलिस उपनिरीक्षक भीमराव कांबळे यांच्या जागरूकतेमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवर गुन्हा दाखल झाल्याची घटना नायगाव मध्ये नुकतीच घडली .या प्रकारामुळे रेती माफियाच्या "रात्रीस खेळ चाले" च्या प्रकाराला आळा बसणार असून महसूल प्रशासनाच्या छुप्या पाठींब्याचे पितळही या निमित्ताने उघडे पडले आहे.

एकीकडे शासनाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी देण्यात येणारी रेती (वाळू) मिळत नसल्यामुळे अनेकांनी घरकुल बांधण्यासाठी काम बंद केले आहे, नायगाव तालुक्यात महसूल प्रशासना च्या आशीर्वादा ने चोरट्या मार्गाने अनेक दलाल मात्र आपला धंदा जोमाने चालवत असुन नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन अवैध रेती नेणा-या एका.हायवा टिप्परवर नायगाव स्टेशन चे पोलिस उप- निरीक्षक श्री.भीमराव कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

दि.१० जानेवारी च्या रात्री २:०० वाजता नायगांव येथील सराफा मार्केट मध्ये पाच बरास रेती भरलेला हायवा टिप्पर क्र.एम.एच.२६.बि.डी.९१०९ हा रात्री पोलीस गस्तीत आढळून आला.याबत पोलिसांनी चौकशी केली असताना सदर रेतीची अवैध मार्गाने चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर वाहन चालक बालाजी दत्तराम मेथे.

वय २३.वर्ष धंदा ट्रक चालक. रा वजीरगाव. ता .नायगाव व नवनाथ बालाजी मोरे राहणार टाकळी त.ब.यांच्यावर.नायगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भीमराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून र .न ७/२०२१ रोजी कलम ३७९/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर रेती ची कीमत अंदाजे विस हजार आठशे पन्चेहत्तर रुपये असून पाच ब्रास रेती सह १0. लाख किमतीचा टिप्पर व दोन्ही आरोपिंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस नायक गंधपवाड व सहकारी करीत आहेत. महसुल प्रशासन मात्र अशा गंभीर बाबीकडे डोळेझाक करताना दिसत आहे हे विशेष.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि