नायगाव तालुक्यात सागवानासह विविध वृक्षांची अवैध कत्तल जोमात

*************************************************

वनविभाग अधिकाऱ्यांच्या मुक संमती मुळे गेल्या वर्षभरात एकही प्रतिबंधात्मक कारवाई नाही

*************************************************

नायगाव दि 22 - नायगाव तालुक्यातील मांजरम,नरसी,कुंटुर,बरबडा परीसरातील क्षेत्रात झाडांची अवैधरीत्या कत्तल बिनदिक्कतपणे केली जात आहे. झाडांची कत्तल करनारे तस्कर वन अधिकाऱ्यांच्या मूक संमती मुळे वरचेवर बेफाम होत असल्याची परिस्थिती सध्या या भागात दिसत आहे,पर्यावरण संतुलनासाठी शासनाकडून नागरिकांना वृक्षसंवर्धनासह विविध उपदेशाचे डोस जनतेला पाजले जात असतात, परंतु शासनाचा वृक्ष बचाव उपक्रमाचा मूळ उद्देश खुद्द वनखात्याच्या पहरेदारांनाच मान्य नाही अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून सध्याची वृक्ष तोड बघून व्यक्त होत आहेत,

नायगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये विनापरवाना अवैध रीत्या अनमोल वृक्षाची कत्तल केली जात आहे.मौजे धनंज, सांगवी, सालेगाव, सुजलेगाव हंगरगा, आदी ठिकाणी हे प्रकार जोमाने सुरू आहेत.याभागातील

सागवान ,आंबा, चींच, लींब, बाभुळ, निलगीरी अशा विविध झाडाची कत्तल करून राहेर येथील विट भट्टीला जोमाने विकल्या जात आहे.

तालुक्यात झाडाची अशी कत्तल वनविभाग अधिका-यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने सुरू आहे. सदर वृक्षाची कत्तल करणारे गुत्तेदार संबधीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच दिवस रात्र अवैध वृक्षतोड करत आहेत.

या तक्रारी बाबत संबंधित वनपाल ,अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याचेही दिसून आले. वनसंरक्षक व वनपाल असे कोणीही जबाबदार कर्मचारी,अधिकारी कुंटूर जिल्हा परिषद सर्कल व नायगाव तालुक्यामध्ये फीरताना किंवा वृक्ष तोडणा-या तस्करांवर कसली कायदेशीर कार्यवाही करतांना दिसत नाहीत. अवैध वृक्षतोड करणाऱ्या गुत्तेदारा सोबत ,अधिकारी व कर्मचारी यांच्यात अर्थपूर्ण समझोता झाल्याची माहिती खुद्द एका लाकूड ठेकेदाराकडून कळाली, पर्यावरण संतुलन नामशेष करण्याची मोहीम या भागात भल्या पहाटेपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे. दिवसभर ट्रक व ट्रॅकटर भरुन झाडे तोडुन लाकडाची अवैध वाहतूक केली जाते आहे. वनखात्याच्या नाकर्तेपणा मुळे अवैध धंदे वाल्यांचे मनोबल वाढले आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात लक्ष घालून आपले अस्तित्व सिद्ध करावे अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांतून सध्या होत आहे *************************************************

पर्यावरण अबाधित राहिले तरच माणूस टिकेल,देश जगेल हे वास्तव लक्षात घेऊन सरकारने वृक्षलागवडीसाठी व संवर्धनासाठी अब्जावधी रुपये खर्च करून आपले प्रयत्न चालवले आहेत, वृक्षारोपण व वृक्ष लागवडी साठी भरपूर खर्चाची तरतूद शासन करत असून कुपंणच असे शेत भस्मसात करत असल्यामुळे या मोहिमेवर जनतेच्या खिशातून खर्च करण्यात काय अर्थ आहे,असा प्रश्न या तस्करीमुळे तीव्रतेने पुढे येत आहे , वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैधरित्या वृक्ष कत्तल करणाऱ्यांना पाठीशी घालणे थांबवावे व आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवून द्यावी अशी मागणी सतर्क नागरिकांतून होत आहे ,सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी संचारबंदी असली तरी अवैध व्यावसायिक या संधीची चांदी करून घेण्यात गर्क असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि