जानापुरी च्या दोन गटातील तुंबळ हाणामारी प्रकरणी प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल


सोनखेड दि 17- लोहा तालुक्यातील जानापुरी येथे दोन गटात निवडणूकीच्या वादातून झालेल्या तुंबळ मारहाणीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने संबंधिता विरुद्ध सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे,

याबाबत अधिक माहिती अशी की जानापुरी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया दि 15 रोजी शांततेत पार पडली, परन्तु दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि 16 रोजी सकाळी आठ च्या दरम्यान गावच्या मुख्य रस्त्यावर पोलीस पाटील बालाजीराव पांचाळ यांच्या घरासमोर गावातील विरोधी गटाचे सदस्य आमने सामने आले,आपापल्या पॅनल प्रमुखांना मदत केल्याबद्दल एकमेकांना जाब विचारल्या जातांना शाब्दिक चकमक झाली,व वादावादीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले ,या हाणामारीत दोन्ही गटांकडून लाठ्या,काठ्या दगडांचा सर्रास वापर झाल्याचे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून आले,पुरुषच नव्हे तर महिला ,वृद्ध मंडळीसह बालकांनीही त्वेषाने सहभाग घेतल्याचे दिसून आले होते, सदर घटनेची माहिती कळताच सोनखेड पोलिसांनी तात्काळ गावात चोख बंदोबस्त लावून परिस्थितीवर नियंत्रण आणले होते,दोन्ही गटातील प्रमुख मंडळी कडून बैठका घेऊन वाद मिटवण्यात आला,परंतु दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता,अल्पावधीत सदरील व्हिडीओ दूरवर पोचला होता,सोनखेड पोलिसांनीच याप्रकरणी दखल घेऊन स्वतः एपीआय महादेव मांजरमकर यांनी कलम 160 अन्वये मंगेश पांडुरंग कदम,अच्युत श्रीराम कदम,सचिन अनिल कदम,गणेश कदम,गणपत मधुकर कदम,शंकर जळबाजी कदम,बळी ज्ञानोबा कदम,हनुमंत सुदाम येवले, विकास गोविंद कदम आदींवर गुन्हे दाखल केले आहेत,अधिक तपास फौजदार चंदनसिंह परिहार हे करत आहेत


---माणिकराव मोरे

पत्रकार,सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि