नायगाव शहरात 21 ते 25 एप्रिल कडक जनता कर्फ्यु ,नगरपंचायत प्रशासनाचा प्रशंसनीय निर्णय

*************************************************

मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी जाहीर पत्रकाद्वारे दिली कठोर कारवाईची सूचना

*************************************************

नायगाव दि 19- नायगाव शहर व परिसरातून सध्या कोविड रुग्णांची आवक लक्षणीय प्रमाणात वाढल्यामुळे नायगाव नगरपंचायत प्रशासनाने दि 21 ते 25 एप्रिल या कालावधीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

नायगांव शहर व परीसरातील सर्व जनतेला नगरपंचायत नगरपंचायत नायगाव चे मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक 21.04.2021 रोज बुधवार पासून ते दिनांक 25.04.2021 रोज रविवार पर्यन्त नायगांव शहरात जनता कर्फ्यू (संचारबंदी) चा निर्णय नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात येत आहे. या कालावधीत फक्त दवाखाने व मेडीकल स्टोअर्स हीच प्रतिष्ठाणें, चालू राहतील बाकी हॉटेल्स, भाजीपाले, फळे मिठाई भाडार सर्व दुकाने बंद राहतील. तसेच शहरातील लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, व बाहेर गावातील लोकांनी नायगांव शहरात येवू नये, असे आढळून आल्यास नियम पायदळी तुडवणाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीर रित्या रस्त्यावर फिरल्या प्रकरणी कलम 144 अन्वये कार्यवाही करण्यांत येणार आहे.

नगरपंचायत नायगाव चे मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी एका पत्रकाद्वारे सदर जाहीर आवाहन केले आहे.कोरोनाच्या महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने नाईलाजाने उचललेले हे पाऊल असून शहरात सध्या जी गर्दी दिसत आहे तयार खऱ्या उद्देशाने फिरणारे कमी आणि विनाकारण फिरणारेच जास्त आढळून येत असल्यामुळे या मुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना ची साखळी तोडण्या साठीच हे खंबीर पाऊल नगरपंचायत प्रशासनाने उचलले आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि