नायगावसोबतच नरसीमध्येही २१ एप्रिल पासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यु

*************************************************

विनाकारण फिरणा-याची कोरोना टेस्ट केली जाणार -सरपंच गजानन (पप्पु) भिलवंडे

*************************************************

नायगाव दि 20 - २१ एप्रिलच्या मध्यरात्री पासून नायगाव पाठोपाठ नरसीमध्ये पाच दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय येथील युवा सरपंच गजानन भिलवंडे यांनी घेतला आहे.सद्यस्थितीत अत्यंत आवश्यक असलेल्या या निर्णयाचे सर्व नागरिकांतून स्वागत होत आहे.

नरसी शहर हे हमरस्त्याच्या चौरस्त्यावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे,या गावातून परराज्यातील मुख्य वाहतुकीची वर्दळ दररोजच सुरू असते, परिसरातील जनताही खरेदी विक्रीच्या निमित्ताने येथे दररोजच मोठया प्रमाणात ये जा करते, नायगाव या तालुक्याच्या ठिकाणी जाणारे बहुतांश नागरिक नरसी मार्गेच ये जा करत असतात. या वेगवेगळ्या वर्दळीमुळे नरसी गावात व मुख्यफाट्यासह परिसरातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग भयावह प्रमाणात वाढत आहे.या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील युवा सरपंच गजानन भिलवंडे यांनी सर्व ज्येष्ठ,श्रेष्ठांच्या सहमतीने कडक जनता कर्फ्यु लागू करण्याचे पाऊल उचलले आहे.

21 एप्रिल पासून हा लॉक डाऊन सुरु होणार असून या काळात घराबाहेर विनाकारण फिरणा-याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे, वर्दळीत सामील होणाऱ्या लोकांकडून या महामारीच्या संसर्ग वाढीचे प्रमाण वाढत आहे हे लक्षात घेऊन सरपंच गजानन (पप्पु) शिवाजी भिलवंडे यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकांच्या हितासाठीच हा जनता कर्फ्यु लागू करण्यात येत आहे, सदरील कर्फ्यु च्या काळात जनतेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दि 21 ते 26 एप्रिल या कालावधीतल्या जनता कर्फ्यु साठी मनोभावे सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे यांनी केले आहे,या महत्वाच्या सार्वजनिक निर्णयाचा अनादर करणाऱ्यांचा इलाज करण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि