शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची नायगाव कोविड सेंटरला भेट


नायगाव दि.05 - राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 04/05/2021 मंगळवार रोजी नायगाव येथे कोवीड सेंटरला शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंढे यांनी भेट दिली व तिथल्या सोयी,उपचार व अडचणी बाबत माहिती घेतली , सेंटर वरील रूग्णा सोबत चर्चा करून त्यांना खाऊ व फळ वाटप करून त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांनी रुग्णांना धीर दिला.

महाराष्ट्रात सध्या कोरोना चा कहर ग्रामीण भागात वाढत आहे ग्रामीण भागातील रुग्ण हे तालुक्याच्या कोविड सेंटर वर उपचार घेत आहेत या सेन्टरवरील उपचार,सुविधांची माहिती घेऊन प्रत्येक जिल्हा प्रमुख थेट

मुख्यमंत्री महोदयाना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सर्व माहिती देणार आहेत त्या अनुषंगाने मुंडे यांनी तालुका निहाय कोविड सेंटरला भेट देऊन माहिती संकलित करणे सुरू केले आहे, रुग्णाच्या अडचणी समजून घेत यावर मात करण्या साठी आवश्यक उपाय योजनां तज्ञ डॉक्टरकडून जाणून घेत आहेत.येथील डॉ देवणीकर देशपांडे यांच्या कडून सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली.अशी माहिती ता प्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी यावेळी दिली.नरसी व नायगाव मध्ये जनता कर्फ्यु सुरू आहे त्यामुळे 100 च्या वर गेलेली रुग्णसंख्या आता 20 वर आल्याचेही भिलवंडे यांनी सांगितले

शिवसेना जिल्हाप्रमुख मा.उमेश मुंडे,यांच्या सोबत रविंद्र भिलवंडे शिवसेना तालुकाप्रमुख नायगाव ,राजेश लंगडापुरे शिवसेना तालुका संघटक नायगाव अनिल बोधने शिवसेना नरसी सर्कलप्रमुख रामदास पवार वीरेंद्र डोंगरे आदी तर कोविड सेंटर प्रमुख डॉ नरेंद्र देवणीकर देशपांडे हे यावेळी उपस्थित होते.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि