वृध्द कलावंत समिती गठीत करून मदत प्रस्ताव मंजूर करा, कलावंतांची उपासमार टाळा-शाहिर बळीराम जाधवनायगाव दि 08- जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक यांची गेल्या दोन वर्षापासून कलावंत समिती गठीत करण्यात आली नाही,नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील कलावंताचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण भागात धुळ खात असल्याने मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कलावंतासाठी समिती गठित करून त्वरित प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी अ. भा. मराठी शाहीर परिषदचे तालुका अध्यक्ष शाहीर बळीराम जाधव यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील कलावंत समिती गठीत झाली नाही,सदरील समिती गठित करुन जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन मिळावे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते व यासह सांस्कृतिक संचालनालय मुंबई, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडेही कलावंताच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले असून आजपर्यंत कोणीही कलावंतांच्या या प्रश्नाविषयी निर्णय घेण्याबाबत पुढाकार न घेतल्यामुळे या लॉक डाऊन काळात कित्येक कलावंत, साहित्यिकावर उपासमारीची वेळ आली आहे,

शासनाच्या विविध कार्यक्रमासाठी किंवा बऱ्याचदा मंत्र्यांच्या आगमनापूर्वी जनता एकत्र जमा करण्यासाठी शाहिरांचे कलापथक प्रशासनाला हवे असते, पण त्यांच्या प्रश्नाविषयीची उदासीनता मात्र निश्चितच निषेधार्ह आहे. कलावंत समिती गठीत करावी व त्वरित प्रस्ताव मंजूर करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे नायगाव तालुका अध्यक्ष शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी केली आहे, तर उपाध्यक्ष शाहीर माधव बैलकवाड यांनी ही या मागणीला पाठींबा दिला आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि