कार्ला त. मा. सरपंचपदी विजयाबाई माधवराव कापसे तर उपसरपंच पदी पॅनल प्रमुख सिद्राम पा.वनशेट्ये


नायगाव दि 27- कार्ला .मा. ग्रामपंचायत सरपंचपदी विजयाबाई माधवराव कापसे तर उपसरपंच पदी सिद्राम पाटील वनशेट्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कार्ला त.मा. ग्रा.प.निवडणूक नुकतीच पार पडली ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल प्रमुख सिद्राम पाटील वनशेट्ये व माजी सरपंच पांडुरंग पाटील वडजे,शंकर पांडुरंग वडजे यांच्या गटाने प्रतिस्पर्धी गटाचा ९ पैकी ६ जागा हस्तगत करून ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत सत्ता प्रस्थापित केली . त्याची फलश्रुती म्हणून नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांची निवड प्रक्रिया अविरोध पार पडली त्यात सरपंच पदा साठी विजयाताई माधवराव कापसे यांचा तर उपसरपंच पदा साठी सिद्राम पा.वनशेट्ये यांचा एक मेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे समस्त गावकरी मंडळीने सहर्ष स्वागत केले.

निवड प्रक्रियेच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य काशीबाई मारोती पा वडजे, सुवर्णा रामदास पा वडजे,सौ वर्षा सुनील कांबळे,चांदू सटवा कांबळे,विरोधी गटाचे इंदरबाई फंताडे, संतोष पा.माहेगावकर,सुंदरबाई मारोती पंदिलवाड,आदीची सभागृहात उपस्थित होती.

विजया नंतर सिद्राम पा.वनशेट्ये यांच्या समर्थकांच्या वतीने साखर वाटून व फटाके वाजवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला,या वेळी गावातील प्रतिष्ठित व पॅनल प्रमुख आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

*******************************************

गावातील सर्व नियोजित विकास कामे मार्गी लावेन ,ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -उपसरपंच सिद्राम पा.वनशेट्ये

कार्ला त.मा.गावातील मतदारांनी मला मोठा आशीर्वाद देऊन विजयी केले तसेच माझ्या पेंनलला पूर्ण बहुमत देऊन माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठी पराकाष्ठा करीन , गावच्या विकासा साठी कटिबद्ध राहील.अशी ग्वाही नूतन उपसरपंच तथा सेवा निवृत्त समाजकल्याण निरीक्षक सिद्राम पा.वनशेट्ये यांनी उपस्थितां समोर बोलताना दिली.

सर्व सामान्य जनतेच्या मनातील ग्रामविकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न ग्रामविकास करून , विकास कामे खेचून आणून पूर्ण करून जनसेवा पूर्ण करीन असा विश्वास नूतन उपसरपंच वनशेट्ये यांनी निवडी नंतर उपस्थितां समोर बोलताना व्यक्त केला. तसेच गेल्या काळात प्रलंबित राहिलेल्या भौतिक सुविधा,घरकुल लाभधारक व निराधार यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून वंचीत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी माझा शासकीय सेवा काळातील अनुभव पणाला लावून निरपेक्ष भावनेने ग्राम सेवा करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे सिद्राम वनशेट्ये यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत सांगितले.

********************************************

---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि