खाकीशाहवली दर्गा संदल (ऊर्स) निमित्त नरसीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

नायगाव दि 26- येथील प्रसिद्ध दैवत हजरत सय्यद खाकीशहावली रहेमतुल्ला अलैह दर्ग्याच्या संदल (उर्स) निमित्ताचे औचित्य साधून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बीबी फातेमा महिला मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध तथा भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नरसी तालुका नायगाव येथील हजरत सय्यद खाकीशहावली रहेमतुल्ला अलैह दर्गा चा संदल (ऊर्स) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू व मुस्लिम बांधवांच्या एकोप्याने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या परिस्थितीला पाहून मिरवणूक व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.परंपरागत दर्ग्यावर चादर चढवून फातेहाखाणीचा कार्यक्रम पार पडणार आहे.अडचणीत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, एखाद्या व्यक्तीचे जीव रक्तामुळे वाचावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उद्देशाने येथील बीबी फातेमा महिला मंडळाच्या अध्यक्षा सय्यद खतीजाबी इस्माईल यांनी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून दिनांक 28 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणाऱ्या व मुखेड रोड जुणेगाव येथे असलेल्या दर्गा मैदानाच्या परिसरात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात दि क्रेसेट फाउंडेशन द्वारा संचालित दि क्रेसेट ब्लड सेंटर ब्लड कंम्पोनट लॅब नांदेड ची टीम कार्यरत राहणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या रक्तदान शिबिराच्या उपक्रमात युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हानही आयोजक बीबी फातेमा महिला मंडळाच्या अध्यक्ष सय्यद खतीजाबी इस्माईल यांनी केले आहे.


--बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि