शासकीय नियमांचे उल्लंघन भोवले, नरसीत तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

नायगाव दि 24-कृषी सेवा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने खते व बियाण्याची विक्री करणे शासनाने बंधनकारक केलेले असताना नरसी ता. नायगाव येथील तीन कृषि सेवा केंद्र चालक शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत ऑफलाईन व्यवहाराद्वारे खत विक्री करीत असताना आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई।करण्यात आली

पंचायत समितीचे कृषीधिकारी यांनी प्रत्यक्ष दुकानात तपासणी केली असता हे कृषिसेवा केंद्र चालक दोषी आढळल्या गेले यावरून या तीन दुकानाचे परवाने सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले.

या दुकानांवर शासकीय निर्देश डावलून ऑफलाईन विक्री सुरू असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषीधिकारी यांना मिळाली, त्यावरून त्यांनी नायगाव व नरसी मधील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता नरसी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्र, शिवकृपा विकास सेवा केंद्र नरसी व चांद कृषी सेवा केंद्रात जावुन तपासनी केली,या तपासणीत वरील तिनही केंद्र चालक मशीनचा वापर करत नाहीत,भावफलक ठळक अक्षरात लावण्यात आले नाही, वजन करण्यासाठी बम काटा उपलब्ध नाहीत, खत साठा असल्याचे रजिस्टर नव्हते तसेच अन्य अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले सदर गैरव्यवहाराबद्दल प.स.नायगाव तालुका कृषी अधिकारी मुरलीधर राजे यांनी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांच्या ऑफलाइन पद्धतीने खते विक्री आहवालाची माहिती गोपनीय रित्या वरिष्ठांकडे पाठविली होते.या वरून ही कार्यवाही करण्यात आल्याचे कळाले.

==================================

त्या दुकानदारावर का कार्यवाही नाही?

---------------------------------------------------------

तालुका कृषी अधिकारी यांनी नायगाव येथील एका बहू चर्चित कृषी सेवा केंद्रात चौकशी केली त्यात सदर विक्रेता दोषी आढळल्या नंतर पोलीस ठाणे येथे 6 जानेवारी रोजी तक्रारही नोंदवण्यात आली, परंतु आर्थिक तडजोडीने हे प्रकरण पोलीस ठाण्यात कृषी दुकान दार व संबंधीतात मांडवली होऊन प्रकरण दडपविण्यात आले आहे. हा काय प्रकार आहे व प्रकरण मिटल्याने त्या केंद्रावर कार्यवाही करण्यात आली नाही का? तर ताज्या प्रकरणात तडजोड झाली नाही म्हणून कार्यवाही झाली का?असा प्रश्न सर्व सामान्यातून विचारण्यात येत आहे.

===================================


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि