अवकाळी कहर..! सूजलेगाव येथे विज पडून एका प्रौढ नागरिकाचा मृत्यू तर पाच महिला जखमी


नायगाव दि 18- नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे वीज पडून एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला तर पाच शेत मजूर महिलां जबर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे

निसर्गाच्या या अवकाळी कहराची सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील मौजे सूजलेगाव येथे बेटकबेली रस्त्यावरील माधव रामजी कुऱ्हाडे यांच्या शेतात हरभरा जमा करण्याचे काम सुरू होते, आज गुरुवारी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान अचानक विजेचा कडकडाट व पाऊस झाला,या प्रकारामुळे घाबरलेले सालगडी माधव वाघमारे यांच्यासह काही महिला असे सर्वजण एका आब्यांच्या झाडाखाली आश्रयाला धावले , यावेळी माधव दिगाबंर वाघमारे ( वय ५५ वर्ष) यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली,त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला,तर यावेळी इतर कामगार महिलांपैकी सुमनबाई दिगांबर वाघमारे,गऊबाई मोहन आईलवार,राधीका माधव पवार,सम्राज्ञी माधव पवार,अर्चना दिगांबर वाघमारे या सुद्धा जबर जखमी झाल्याने त्यांना योग्य उपचारासाठी तातडीने नांदेडला हलविण्यात आल्याचे कळाले,

गेल्या काही दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून ढगांचा गडगडाटही सुरू होता. दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे . अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील गडी झाडाच्या आश्रयाला गेला आणि तिथेच त्याचावर काळाने झडप घातली,या दुर्दैवी घटनेमुळे सुजलेगाव या गावासह परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.मंडळ अधिकारी डी.डी.कळकेकर व तलाठी टि.ई.दासरवार यांनी माहिती कळताच तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा केला आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि