कोरोना उपचाराच्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा व साठेबाजांवर कार्यवाही करा

*************************************************

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस वसंत सुगावे पाटील यांची महत्वाची मागणी

*************************************************

नांदेड दि 07-जिल्ह्यात कोरोना या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने हाहाकार माजवला आहे, कोविड ग्रस्तांची संख्या वरचेवर वाढतच आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही या सबबीखाली दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत. रुग्णांची सुरू असलेल्या अडवणूकीची अत्यन्त गांभीर्याने दखल घ्यावी व कृत्रिम टंचाई करणाऱ्या साठेबाजांवर कडक कार्यवाही करावी, रेमडेसीवीर इंजेक्शन गरजेनुसार प्रत्येक रुग्णांला शासन निर्देशित दराने उपलब्ध करून द्यावे अशी महत्वाची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात सध्या दररोज 1000 ते 1500 नव्या कोविड रुग्णांची आवक सुरू आहे, यापैकी 200 हुन अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यम व तीव्र बाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन अत्यन्त आवश्यक ठरले आहे. रुग्णवाढी मुळे या इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेते अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा मोठा काळा बाजार करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी याबाबत काहीही हस्तक्षेप करावयास तयार नसल्याचे उघडपणे लक्षात येत आहे, इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. इतर अनेक रुग्ण सध्या गंभीर अवस्थेत असून सदरील रेमडेसीवीर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासनामार्फत करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादूल होणवडजकार,हणमंत जगदंबे आदी उपस्थित होते.सुगावे यांच्या मागणीवर जिल्हा प्रशासन काय हालचाल करते याकडे असंख्य रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि