मांजरम ग्रा.पं. च्या पाच वर्षातील गैर व्यवहाराची चौकशी करा अन्यथा जि.प.समोर उपोषणाचा इशारा

नायगाव दि 09- नायगाव तालुक्यातील मांजरम ग्रामपंचायतीत सन 2015 ते 2020 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातुन झालेल्या विविध कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा दिनांक 25/03/2021 रोजी पासून जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला बसण्याचाइशारा मुख्यकार्यकारी जि.प.नांदेड यांना निवेदना द्वारे पहेलवान गंगाधर मेडकर व अन्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.

जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ,मांजरम ग्रामपंचायत अंतर्गत 2015 ते 2020 काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, तत्कालिन सरपंच व ग्रामसेवकांनी स्वतःच्या आर्थीक हितासाठी संगनमतातुन गावाच्या विकासासाठी 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत आलेला निधी थातुरमातुर कामे करुन व कागदोपत्री कामे झाल्याचे दर्शवून वरिष्ठांना हाताशी धरून गिळंकृत केला आहे.

14 व्या वित्तआयोगाच्या निधीचा लाखो रुपयांचा दुरुपयोग मांजरम ग्रा.प.ने केला असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे, या कामामध्ये हायगॉवस लाईट. शाळा संरक्षण भिंतीचे बांधकाम, दलितवस्ती परिसरातील एल.ई.डी. बल्ब,दलित वस्ती रस्ता बांधकाम इ. कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आज, कामे न करता उपलब्ध निधी संगनमताने थेट हडप केला असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत उल्लेखित करण्यात आला आहे. यामुळे गावचा विकास बाजूलाच राहिला पण भ्रष्टाचार साखळीत सामील असलेल्यांचेच उखळ पांढरे झाले आहे,तत्कालिन ग्रामसेवक सरपंच यांच्या संगनमताने सदर प्रकार घडला आहे,विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी नायगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच करण्यात आली होती परंतु काहीच उपयोग झाला नाही, तक्रार दारांनी गटविकास अधिकारी नायगांव यांच्यासह ,मांजरम ग्रा.प.च्या तत्कालीन ग्रामसेवक सरपंच यांच्या गैर कारभाराची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात दोषी असलेल्या ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 25/03/2021 पासून मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प नांदेड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रति ग्राम विकास अधिकारी (ग्रा. पं.) मांजरम, जि.प. नांदेड. पोलीस निरिक्षक , पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड.यांनाही देण्यात आल्या आहेत.निवेदनावर निवेदक मेडकर गंगाधर लालजी,व्यंकटराव दत्तात्रेय पाटील शिंदे, नव्हारे आनंद भुजंग सामाजिक कार्यकर्ते सर्व रा.मांजरम,ता.नायगांव,जि.नांदेड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


----बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि