मांजरमच्या नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या श्रीमती शेख यांचे दुःखद निधननायगाव दि 27 - मांजरमच्या ग्राम पंचायत मधील वार्ड क्र.पाच च्या सर्वसाधारण प्रवर्गातून नुकत्याच निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्या श्रीमती नासिराबी गणी साब शेख यांचे हृदय विकाराने मंगळवारी दुपारी आकस्मिक निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर रात्री 8 वा मुस्लिम समशान भूमीत दफन विधी करण्यात आला.

नवनिर्वाचित ग्रा. प.सदस्या नसिराबि गन्नीसाहेब शेख या आठ दिवसांपूर्वीच निवडून आल्या होत्या, त्यांच्या विजयाचा आनंद केवळ आठ दिवसच राहिला त्यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे शेख कुटुंबिया वर मोठाआघात झाला आहे तसेच मांजरम येथे तीव्र शोक संवेदना व्यक्त होत आहेत, श्रीमती शेख यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुले,सून पती असा परिवार आहे.या घटनेनेचे वृत्त सर्वत्र पसरताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेट घेऊन दुःख व्यक्त केलेआहे.येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते गन्नीसाहेब शेख यांच्या त्या पत्नी होत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि