ग्रामविस्तार अधिकारीच नसल्याने मांजरम ग्राम पंचायतीला संतप्त नागरिकांनी कुलूप ठोकले


नायगाव दि 11-तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मांजरम ग्राम पंचायतीमध्ये मागील पंधरा दिवसापासून ग्राम विकास अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून संतप्त आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मांजरम येथील ग्राम पंचायतीचे ग्रामविकास आधिकारी पंधरा दिवसा पासून उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची अडवणूक होत आहे, स्थानिक विद्यार्थ्यांचेही दोनशे ते अडीचशे फार्म रखडले आहेत,शेतकऱ्याच्या कृषी योजनेच्या कामातही अडथळे निर्माण झाले असून,अनेकांच्या विविध कामाच्या फाईली ग्रामपंचायत येथे बेवारसपणे पडुन आहेत ,ग्रामविकास अधिकारी आज येतील उद्या येतील अशी वाट पाहून थकलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आज संतप्त पवित्रा घेतला व ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

या अनागोंदी परिस्थितीविषयी गटविकास अधिकारी पी.पी.फाणजेवाड यांच्याशी दोन दिवसा पूर्वी संपर्क केला असता तत्कालीन ग्रामसेवक सुधाकर वडजे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुगाव येथे कार्यरत असलेले पाटील यांची नियुक्ती झाली आहे, येत्या दोन दिवसात नवे ग्रामविकास अधिकारी चार्ज घेतील त्यांनी सांगितले.या विषयी नूतन ग्राम विस्तार पाटील यांनाही विचारणा केली असता येत्या शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पदभार घेणार असल्याचे कळाले,

******************************************

या विषयी पंचायत समीती येथील गटविकास आधिकारी यांना वेळोवेळी फोन वर कल्पना देवुनही अजुन जुने ग्रामसेवक सुधाकर वडजे हे पदभार देत नाहीत या मुळे नवे ग्रामसेवक पाटील 2 मार्च रोजी आदेश निघुनही ही रुजू झालेले नाहीत.गावकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.पूर्वीचे ग्रामसेवक वडजे हे अनेकांना उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी ही ऐकण्यात आल्या.या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या

गावातील नागरीकांनी ग्रा.पं.मांजरमला.कुलुप लावले आहे.

कुलूप लावतांना माजी ग्रा प सदस्य पत्रकार शिवाजी पा.शिंदे (शिवसेना सर्कल प्रमुख),तसेच दिलीप दीगबर पा.शिंदे

विठ्ठल शेट्टेवाड (ग्रां.प.सदस्य.प्र),

संजय जाधव (ग्रा.प.सदस्या.प्र),

गोविंद उलगुलवाड (ग्रां.प.सदस्य.प्र),

शेषेराव वाकरडे व गावकरी पुरुष,महिला उपस्थीत होते.

******************************************

ग्राम विस्तार अधिकारी नाही हे वरिष्ठांना तत्काळ सांगूनही कार्यवाही न झाल्याने हा प्रसंग ओढवला- सरपंच शोभाबाई मांजरमकर

मांजरम ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच शोभाबाई निळकंठ मांजरमकर याना संपर्क केला असता ग्राम विस्तार अधिकारी नसल्याने कामे खोळंबली आहेत ,त्वरित जुन्या ग्रामसेवकाने नव्या ग्रामसेवकांना पदभार देण्या बाबत आदेश द्यावे असे गटविकास अधिकारी पी.पी. फाणजेवाड, विस्तार अधिकारी कांबळे, यांना सांगितले .येत्या दोन दिवसात पदभार दिला जाईल नाही दिल्यास कार्यवाहीचे आश्वासन गटविकास अधिकारी यानी दिल्याने आता शुक्रवारी पदभार हस्तांतरित होणार आहे असे ग्रामस्थांना मी कळवले आहे. वरिष्ठांना कळवून ही लवकर कार्यवाही झाली नसल्याने हा प्रकार घडला असे सरपंचांनी सांगितले.

******************************************


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि