मेळगाव च्या सरपंच पदी युवा कार्यकर्ते महिपाळे तर उपसरपंचपदी शिंदे यांची निवड


नायगाव दि 19- मेळगाव ता नायगाव च्या सरपंच पदी तरुणतडफदार सुशिक्षित विदयार्थी कार्यकर्ते अमोल रामानंद महिपाळे वय वर्ष 26 यांची बिनविरोध तर उप सरपंच पदी शांताबाई आनंदराव शिंदे यांची चार विरुद्ध तीन मताने निवड करण्यात आली आहे

नायगाव तालुक्यात सुप्रसिद्ध वाळूघाटचे ठिकाण म्हणजे मेळगाव- धनज हे होय, येथील बहुतेक लोकसंख्या धनाढ्य श्रेणीतील आहे, येथील ग्राम पंचायत निवडणूक अतिशय रंगतदार व चुरशीची झाली.या अटीतटीच्या निवडणुकीत चार विरुद्ध तीन असा विजय मिळवत पोलीस पाटील गटाने बाजी मारली .

या गटाने गावची सता परिवर्तित केली आहे, गावातील सुशिक्षित तरुण अविवाहित असलेल्या अमोल महिपाळे या युवकास रिंगणात उतरवून गावकऱ्यांनी विजयी केले व सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली .वयाच्या अवघ्या 26 वर्षी सरपंच पदाची संधी मिळालेल्या अमोल महिपाळे यांनी गावचा विकास हाच ध्यास मनी धरून युवकासह ग्रामस्थांच्या मनातील अपेक्षित ग्राम विकास नक्की साध्य करीन असे मनोगत व्यक्त केले.

नायगाव तहसील चे अव्वल कारकून पेशकार आलमवाड यांच्या अध्यक्षते खाली सरपंच पदाची निवड करण्यात आली.या वेळी ग्रामसेवक एस आर संगेवार,तलाठी सोनुने यांची सहायक म्हणून उपस्थिती होती.सरपंच पद अनुसूचित जाती साठी असल्याने अमोल महिपाळे यांचे एकमेव नामांकन आले होते, त्यांची अविरोध निवड करण्यात आली.तर उप सरपंच पदा साठी शांताबाई आनंदराव शिंदे व विरोधी गटाकडून गोदावरीबाई मारोती शिंदे यांचा अर्ज आल्याने व गुप्त मतदानाची मागणी झाली,यात चार विरुद्ध तीन मताने शांताबाई शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी आलमवाड यांनी जाहीर केले.

या वेळी सरपंच उपसरपंचासह ग्रा.प.सदस्य चंद्रकला प्रदीप धसाडे, सविता शंकर कुरणापले,विरोधी गटाचे गोदावरीबाई मारोती शिंदे,माधव बालाजी शिंदे,गंगांधर थारोबा कंदवाड यांची उपस्थिती होती.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि