राज्य मंत्री ना.बच्चू कडू यांची कुष्णुर औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेगा फूड अनाज लि.ला भेट

उद्योग समुहातिल विविध उत्पादनाची घेतली माहिती घेतांना श्री अजय बाहेती यांच्या कार्याची प्रशंसा

*************************************************


नायगाव दि 26- राज्यमंत्री ना.बच्चू कडू यांनी बुधवारी दुपारी कृष्णुर औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेगा फूड अनाज लि. या उद्योग प्रतिष्ठाणला भेट देऊन येथे एका छताखाली

उत्पादित होणाऱ्या विविध उत्पादनाची उत्सुकतेने माहिती घेतली ,कृष्णुर सारख्या ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीत उत्पादन निर्मिती साठी अजय बाहेती यांनी केलेल्या यशस्वी धाडसाचे कोतुक करून त्यांना आपल्या अमरावती भागातही येण्यासाठी निमंत्रित केले.

बाहेती यांनी उभारलेल्या इंडिया मेगा अनाज या उपक्रमाअंतर्गत अंत्यत कष्टाने आपल्या प्लांट मध्ये 16 प्रकारचे उद्योग आजवर यशस्वीपणे सुरू केले आहेत, त्यांच्या या उद्यमशीलते मुळे या भागातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराची उपलब्धी झाली आहे. ना. बच्चू कडू यांनी पूर्ण प्लांटची उत्सुकतेने पाहणी केली व विविध माहिती जाणून घेतली.

प्रत्येक युनिट ला भेट देतांना अभ्यासपूर्ण माहिती घेतली व भेटी दरम्यान उपस्थित कामगारांशीही विविध अनुषंगाने चर्चा केली,तब्बल तीन तासांपर्यंत ना कडू यांनी उद्योग केंद्राची पाहणी केली,या उद्योगसमूहाद्वारेयेथील कामगारांना उपलब्ध असलेल्या जेवणासाहित मिळणाऱ्या विविध सुविधे बद्दल,व उत्पादन गुणवत्ते बद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मंत्री बच्चू कडू यांनी बाहेती परिवाराने केलेल्या पाहुणचाराचा आस्वाद घेत येथील कामगारां समवेत भोजन केले.व अजय बाहेती यांच्या कार्यकुशलतेचे,उपक्रमशिलतेचे मनस्वी कौतुक केले,बाहेती यांना मराठवाड्यात केलेल्या या उद्योगाच्या यशस्वी धारिष्ट्या बरोबरच विदर्भात विकास साध्य करण्या साठी अमरावती येथे उद्योग उभारण्यासाठीही निमंत्रण दिले.या भेटी दरम्यान त्यांनी सिटरस या कंपनीलाही भेट दिली.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि