मराठवाडा जनता विकास परिषद तालुका शाखा नायगाव तर्फे मराठवाडा विकास मंडळास मुदतवाढ देण्याची मागणी

नायगाव दि १ - मराठवाडा विकास मंडळास मुद्दतवाढी सह इतर मागण्यांसाठी मराठवाडा जनता विकास परिषद तालुका शाखा नायगावच्या वतीने मागण्या चे निवेदन तालुक्याच्या तहसिलदार डॉ. सौ.मृणाल जाधव यांना देण्यात आले व तत्पूर्वी विविध मागण्यांसाठी घोषणांही देण्यात आल्या. यामध्ये मजविपचे ज्येष्ठ सदस्य श्री हणमंतराव खंडगावकर, ऊपाध्यक्ष सौ. निर्मलाताई धुप्पेकर, मोहनराव पाटील धुप्पेकर, भाऊराव मोरे सचिव, हणमंत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सौ.डॉ. जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने मराठवाडा- विदर्भ व ऊर्वरीत महाराष्ट्र मागास मंडळांना घटनेचे कलम ३७१ अन्वये मुदतवाढ देण्यात यावी,अनुशेष निर्धारणीसाठी नविन समितीच्या गठण करण्यात यावे,

मराठवाड्यातील सर्व जिल्हे जोडणारे ग्रामीण भागातील तालुक्यांना जोडणारे पक्के रस्ते व्हावेत,नांदेड- बीदर रेल्वे मार्गाचे काम नियोजित वेळ्त पूर्ण व्हावे, नांदेड व लातूर येथे नवीन आयुक्तालये लवकर स्थापना करावी,नांदेड जिल्ह्यातील मानार प्रकल्पाच्या कालव्याचे अस्तरीकरण झालेच पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात नोक-या ऊपलब्ध करून द्याव्यात,आदी मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावर भाऊराव मोरे, निर्मलाताई धुप्पेकर,मोहनराव पाटील धुप्पेकर, हणमंत राव खंडगावकर,बाबूराव अडकिणे, हणमंत जाधव,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि