रुग्णवाहिकेच्या जबर धडकेने वानराचा मृत्यू,जायबंदी वानराने मृत्यूपूर्वी श्री हनुमानाचे चरण कवटाळले

मुक्या जनावराचा जीव वाचवण्यासाठी परिसरातील सुहृदांनी केला आटोकाट प्रयत्न

***************************************************


नायगाव दि 04 - नरसी - हैद्राबाद मार्गावर भरवेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडून जाणाऱ्या वानराला जबर धडक दिली, अपघातानंतर रुग्णवाहिकेचा चालक फरार झाला तर अपघातात जायबंदी झालेल्या वानराने तिथेच लिंबाच्या झाडाखाली असलेल्या हनुमान मुर्तीला कवटाळले व अक्षरशः हात जोडून मृत्यूपूर्वी जणू देवाची आराधनाच केल्याची घटना घडली

याबाबत अधिक वृत्त असे की,३ एप्रिलरोजी शनिवारी दुपारी २ च्या सुमारास एक वानर नरसी ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते, भरवेगाने आलेल्या एका रुग्णवाहिकेने त्या वानरास जबर धडक देवून जखमी केले,अपघातानंतर चालक फरार झाला. खरेतर रुग्णवाहिकांचे चालक रुग्णाचे प्राण वाचवणारे म्हणून ओळखले जातात.मात्र त्या मुक्या प्राण्याला वाऱ्यावर सोडून सदरील चालक मात्र पसार झाला. आश्चर्यकारक बाब अशी की अपघातात गंभीररीत्या जायबंदी झालेले हे वानर बाजूलाच एका लिंबाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीच्या मूर्तीला कवटाळून तडफडत बसले होते

ही घटना लगतच्या शेतातील काही नोकरदाराना समजताच त्यानी शेतमालक संभाजी पाटील भिलवंडे यांना फोनद्वारे कळविली, भिलवंडे यांनी क्षणांचा ही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली, वैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, त्या वानराचा प्राथमिक उपचार करून त्या वानरास नायगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र उपचारादरम्यान १९ टाके मारूनही उपयोग झाला नाही असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी सांगितले,त्या रुग्णवाहिका चालकाचा युध्द पातळीवर शोध घेवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यावेळी नरसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धोत्रे, डॉ हाळे, रतन गुंठे व वनविभागाचे वनरक्षक पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राजू भालेराव,डाके यांनी त्या जखमी वानरास वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले,यावेळी बालाजी भिलवंडे,पत्रकार दिलीप वाघमारे काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख जब्बार,अजित जाधव,राजू मारवाळीकर यांच्यासह अनेक युवकांनी भुतदये पोटी उपचारांची पाहणी केली.


**************************************************

या पूर्वी अशाच एका घटनेत संभाजी भिलवंडे यांचे कार्यकर्ते राजू मरवाळीकर यांनी पुढाकार घेऊन जीप चालक मालक यांच्या एकत्रित सहकार्याने नरसी मुखेड राज्य मार्गावर होटाळा शिवारातील दत्तू पाटील होटाळकर यांच्या शेता जवळ अपघातात मयत झालेल्या वानराची समाधी बांधून घेतली होती,तिथे दर वर्षी भंडरा महाप्रसादाचेही आयोजन केले जाते,मुक्या प्राण्यांसाठी अजूनही अनेकांच्या मनातली माणुसकी जिवंत आहे याचाच प्रत्यय नरसी च्या या घटनेवरूनही दिसून आला हे विशेष होय

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि