नायगाव तालुक्यात कोरोनाचे तीन बळी,बुधवारी कोरोना बाधित रुग्ण संख्या 36

नायगाव दि 31- नायगाव शहर व तालुक्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढला असून बुधवारी आलेल्या शासकीय प्रेस नोट प्रमाणे तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. दोघावर नांदेडमध्ये तर एका वर देगलूर मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

नायगाव शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून आत्तापर्यंत २५० च्या वर बाधीत रुग्ण आढळले आहेत.यातील काही बरे झाले असले तरी बुधवारी आलेल्या प्रेस नोट प्रमाणे 36 जण पॉझिटिव्ह असून पूर्वीचे 169 व हे 36 एकूण 205 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.यातील जास्त लक्षणे आहेत त्यांना नांदेड,मुखेड,देगलूर,येथे उपचार चालू आहेत,तर काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.जास्त लक्षण नसणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून यातील बहुतांश रुग्णांवर येथील नायगाव कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

नायगाव शहरातील एका 41वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालय नांदेड येथे मृत्यू झाला आहे. तसेच कुंटुर येथील 75 वर्षीय महिले चा शासकीय रुग्णालय नांदेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.तिसऱ्या घटनेत मांजरम ता.नायगाव येथील 89 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला,त्यांना परिवारातल्या सदस्यकडूनच कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

फिरून आलेला हा कोरोनाचा दुसरा प्रकार पूर्वीपेक्षा घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे,या नव्या कोरोनाची प्रसार क्षमता खूप जास्त आहे, मध्यंतरी सर्वजण या महामारीला विसरल्याप्रमाणे वागत होते,परंतु दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मात्र नागरिकांत भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे,कोरोना प्रतिबंधक लस अजून सर्वांना मिळाली नसून केवळ बचावात्मक उपाययोजना अंगिकारून नागरिकांना आपला बचाव करणे आवश्यक झाले आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि