सावधान.. कोरोना कहर वाढत आहे,नायगावात मंगळवारी 19 कोरोना ग्रस्त,एकूण संख्या शतकपार

नायगाव दि 24 -नायगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार आरटीपीसीआर चाचणीत 11 तर अँटीजन चाचणीत 8 असे एकूण 19 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.पूर्वीचे 85 व मगंळवारचे 19 असे मिळू न तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 104 वर गेली आहे.

बाधित रुग्णापैकी काही रुग्ण नायगाव ,तर काही रुग्ण नांदेड येथे उपचार घेत आहेत.क्षीण संसर्ग असलेले रुग्ण होम आयसोलेशन मध्ये बंदिस्त झाले आहेत

आजच्या 104 पैकी रुग्ण नायगाव शहर,मांजरम,बरवडा,कुंटुर,नरसी ,सह सर्कल मधील काही गावातील आहेत.ज्यांना लक्षण नाहीत अशा रुग्णांनी बाहेर बाजार पेठेत न फिरता घरी आयसोलेशन मध्ये राहून प्रशासनाला व जनतेला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ हनुमंत गुंटूरकर ,व कोव्हिड सेंटर प्रमुख डॉ देशपांडे देवणीकर यांनी केले आहे


-- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि