नायगाव मध्ये शुक्रवारी 10 कोरोना ग्रस्त,एकूण संख्या 33 वर

*************************************************

आयसोलेशन मधील रुग्णांनी घरीच थांबावे- डॉ शेख बालन

*************************************************

नायगाव दि 19- नायगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्याआहवाला नुसार 10 जण कोरोना पॉजीटिव्ह आले आहेत.तर पूर्वीचे 23 असे एकूण तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 33 वर गेली आहे.

यातील दोन रुग्ण नायगाव ,तर पाच रुग्ण नांदेड येथे उपचार घेत आहेत.तर बाकीचे 26 रुग्ण तीव्र लक्षणे नसल्यामुळे त्यांना होम आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे.तीव्र लक्षणे नाहीत म्हणून हे रुग्ण सरार्स पणे बाजार पेठेत फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

एकूण 33 पैकी नायगाव शहरातील 15 रुग्ण असून बाकीचे रुग्ण मांजरम, बरबडा, कुंटुर,नरसी गावातील व सर्कल मधील गावातील आहेत,ज्यांना तीव्र लक्षणे नाहीत अशा रुग्णांनी बाहेर बाजार पेठेत न फिरता घरीच आयसोलेशन मध्ये राहून प्रशासनाला व जनतेला सहकार्य करावे व कोरोनाचा प्रसार वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालन शेख यांनी केले आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि