बापरे ...नायगाव मध्ये बुधवारी चक्क 32 नवीन कोरोना ग्रस्त,एकूण संख्या 136 च्या वर

नायगाव दि 24- नायगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार आरटीपीसीआर चाचणीत 25 तर अँटीजन चाचणीत 7 असे एकूण 32 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.पूर्वीचे 104 व बुधवारचे 32 मिळून तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 136 वर गेली आहे.

यातील काही रुग्ण नायगाव कोव्हिड सेंटर ला 32 जण उपचार घेत असून , काही रुग्ण नादेड येथे उपचार घेत आहेत.बाकीचे रुग्ण कमी लक्षण असल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे.

एकूण 104 पैकी रुग्ण नायगाव शहरातील,व मांजरम,बरवडा,कुंटुर,नरसी ,सह सर्कल मधील गावातील आहेत.ज्यांना लक्षण नाहीत अशा रुग्णांनी बाहेर बाजार पेठेत न फिरता घरी आयसोलेशन मध्ये राहून प्रशासनाला व जनतेला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि