अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी 25 जानेवारी पासून नायगाव तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन.

नायगाव दि 24-महसूल प्रशासनाला वेळोवेळी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कळवूनही कुठलीच कार्यवाही झाली नसल्यामुळे तालुक्यातील मौजे मेळगाव, होटाळा, कृष्णुर व अंतरगाव येथील परवानाच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम उत्खनन होत असल्याच्या निषेधार्थ नायगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 जानेवारी पासून येथील सामाजिक कार्यकर्ते

बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन तहसिल कार्यालय नायगाव येथे देण्यात आले आहे.

शासनाची मालमत्ता जतन करण्यासाठी महसूल अधिकार्‍यांना शासनाकडून भरमसाठ पगारी सुरू आहेत यासोबतच दंडात्मक कार्यवाही करण्याचर अधिकारही दिले असले तरी परिसरात अवैध मुरूम उत्खनन महसूल प्रशासनाच्याच मेहरबानीमुळे होत आहे ही निषेधार्ह वास्तविकता आहे, मेळगाव शिवारातील गट क्रमांक 56 मधील देवराव सूर्यवंशी यांच्या नावे 500 च्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाले तर होटाळा येथील गट क्रमांक 162 मध्ये मधुकर राठोड यांच्या नावे शंभर ब्रास परवान्या खाली दोन-तीन जेसीबी द्वारे दिवस-रात्र अनेक हायवाद्वारे मुरूम उत्खनन व वाहतूक करण्यात आली. याबाबत संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसूलचे नायब तहसीलदार यांना वेळोवेळी कळवून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. कृष्णूर, अंतरगाव मध्येही असाच प्रकार घडला आहे. संबंधित महसूल अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी व सदर चारही गावातील मुरूम उत्खनन केलेल्या जागेवर ईटीएस मशीनद्वारे मोजमाप करावे व ग्रामीण शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्यावी या मागणीसाठी दिनांक 25 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते माधव बैलकवाड,विश्वंभर वन्ने, शेख आरीफ यांनी प्रभारी तहसीलदार मृणाली जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि