मुगाव येथे महिला उमेदवाराच्या पतीचे निधन,तर गोधमगाव येथे मतदाराचे निधन

नायगाव दि 16 - निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ उमेदवारांचाच नव्हे तर निवडणूक यंत्रणा, कार्यकर्ते, आणि कधी कधी मतदारांचाही कस पणाला लागतो,आणि या अशा धुमश्चक्रीत बऱ्याच वाईट वार्ताही अनुभवाव्या लागतात,याचे प्रात्यक्षिक नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निमित्ताने दिसून आले,

मुगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीतिल उमेदवारांचे पति धोंडिबा फत्ते यांना या धावपळीत झालेली दगदग भोवली असून त्यांचे हृदय विकाराने निधन झाल्याची वाईट वार्ता आहे,तर गोधमगाव येथे मतदान हक्क बजावून परतणाऱ्या मतदाराचे ( सुधाकर इसनकरले) अकाली निधन झाले.

मुगाव ता नायगाव येथील निवडणुकीसाठी एकीकडे मतदान सुरु असताना दुसरीकडे निवडणूक लढवणारे उमेदवार लक्ष्मीबाई धोंडीबा फते यांचे पती माजी सरपंच प.स.सदस्य धोंडीबा केरबा फते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अशोक पाटील मुगावकर यांच्या गटाकडून प्रभाग १ मधून पत्नीला उमेदवारी मिळाल्यानंतर मागच्या पंधरा दिवसापासून धोंडीबा फते हे आपल्या पत्नीच्या विजयासाठी परिश्रम घेत होते. पण प्रचाराची दगदग वाढल्याने व प्रकृती अस्वस्थता मुळे दुपारी तीव्र हदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

ही घटना मुगावकरासाठी धक्का दायक ठरली असून अनेकांच्या ओळखीचे फत्ते मामा यांचे निधन ही ही बाब गावकऱ्यांच्या।काळजाला चटका लावणारी ठरली. तर दुसरीकडे गोधमगाव येथे दिवसभर गावात फिरलेले व मतदानाचा हक्क बजावून रात्री घराकडे जाणाऱ्या मतदार सुधाकर इसनकरले वय 43 वर्ष यांचेही अकाली निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असताना अचानक घडून आलेल्या या दोन अनाहूत अपमृत्यु मुळे नायगाव तालुक्यात निवडणूक रंगाला एक अर्थाने काळाने गालबोट लावले आहे,निवडणूकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांत या दोन मृत्यूमुळे शोकपूर्ण भावना व्यक्त होत आहेत


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि