मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निमित्ताने नायगाव तालुक्यात माजी खासदार व माजी आमदार आमने सामने

नायगाव दि 24- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणाच्या नायगाव तालुका मतदार संघातून भाजपचे माजी जि प शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर,भाजप आमदार राम पाटील रातोळीकर या दोन दिग्गजांनी सबुरीचे धोरण अवलंबत माघार घेतली आहे,त्यामुळे येथील निवडणूक आखाड्यात पुन्हा एकदा पारंपारिक व मुरब्बी विरोधक माजी आमदार वसंतराव चव्हाण विरुद्ध माजी मंत्री तथा माजी खा. गंगाधरराव कुंटुरकर यांच्यातच पुन्हा एकदा इरेसरीचा सामना रंगणार आहे

नायगाव तालुका सोसायटी मतदार संघात एकूण 51 मतदार आहेत, यातील संचालक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकरजी एव्हढ्या उतार वयातही तडफेने कंबर कसून रिंगणात उतरले आहेत. या पूर्वीच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राजेश कुंटुरकर यांनी राजकीय कसरती करून फोडा फोडीच्या यशस्वी चालीचा अवलंब करून शिवराज पाटील होटाळकर यांचा पराभव करीत विजय मिळवला होता.

या वेळी स्वतः वयोवृद्ध नेते गंगाधर राव कुंटुरकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे,माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनीही दुसऱ्या बाजूने आपली प्रतिष्ठा पणाला लावत कुंटुरकरांसमोर आपले तुल्यबळ आव्हान उभे केलेआहे,सध्या निसर्गानेही ढगाळ वातावरणाचा देखावा निर्माण केला असून या निवडणूक निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरणही कुंद झाले आहे, मतदानासाठी पात्र असलेल्या मतदार राजाला येथेच्छ मेजवान्याची बिदागी देत या निवडणुकीत दोन्ही परस्पर विरोधी उमेदवारांनी रंगत आणली आहे.जिल्हा बँक निवडणूकितही राज्यात सत्ताधारी असलेली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पुरस्कृत गटात हा सामना रंगणार आहे,दोन्ही बाजूने तुल्यबळ व भक्कम तयारी असलेले प्रतिस्पर्धी मैदानात उतरले आहेत,परंतु दोन्ही बाजूने वरकरणी प्रोत्साहन देणारे व हवा भरणारे पडद्यामागील महत्वाचे सूत्रधार प्रत्यक्ष निवडणूकित नेमक्या काय हालचाली करणार यावरच या प्रतिष्ठेच्या युद्धात कोण बाजी मारणार हे निकालानंतरच कळणार आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि