एप्रिल महिन्यात नांदेड रेल्वे विभागातून सहा गाड्या सुरु होणार,नांदेड-आदीलाबाद फेरीचा समावेश

नांदेड दि 30- रेल्वे प्रशासनाने कळवलेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे विभागाकडून विविध ठिकाणी जाण्यासाठी एप्रिल महिन्यात 6 नवीन विशेष रेल्वे फेऱ्या सुरु केल्या जाणार आहेत. भोकर,हिमायतनगर, किनवट तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची असलेली नांदेड आदीलाबाद फेरी दि 01 एप्रिल पासून सुरू होत आहे

नांदेड स्थानकावरून एप्रिलमध्ये सुरू होणार असलेल्या नवीन फेऱ्यांची माहिती याप्रमाणे


1)गाडी संख्या 07409 आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस ही फेरी दिनांक 1 एप्रिल पासून आदिलाबाद येथून सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि किनवट, हिमायत नगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे 11.55 वाजता पोहोचेल.

2) गाडी संख्या 07410 नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 1 एप्रिल पासून नांदेड येथून दुपारी 15.05 वाजता सुटेल आणि भोकर, हिमायत नगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे सायंकाळी 18.55 वाजता पोहोचेल.

3) गाडी संख्या 02753 नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी : हि गाडी दिनांक 6 एप्रिल पासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी 09.00 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

4) गाडी संख्या 02754 निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी : हि गाडी दिनांक 7 एप्रिल पासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री 22.40 आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे रात्री 00.35 वाजता पोहोचेल.


5) गाडी संख्या 07619 नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) : दिनांक 02 एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी 16.50 वाजता पोहोचेल.

6) गाडी संख्या 07620 औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी ) : दिनांक 05 एप्रिल पासून नांदेड येथून रात्री 01.05 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी 06.15 वाजता पोहोचेल.

7) गाडी संख्या 07621 औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) : दिनांक 02 एप्रिल पासून औरंगाबाद येथून रात्री 20.50 वाजता सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळ मार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी 19.00 वाजता पोहोचेल.

8) गाडी संख्या 07622 रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) : दिनांक 03 एप्रिल पासून रेनीगुंटा येथून रात्री 21.25 वाजता सुटेल आणि गुंटकळ, रेचुर, विकाराबाद, परभणी मार्गे औरंगाबाद येथे रात्री 22.15 वाजता पोहोचेल.

9) गाडी संख्या 02767 नांदेड ते संत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी) : हि गाडी दिनांक 05 एप्रिल पासून नांदेड येथून दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि किनवट, नागपूर, रायपुर, बिलासपुर, चक्रधरपूर, खरगपूर मार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 19.20 वाजता पोहोचेल.

10) गाडी संख्या 02768 सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर बुधवारी) : हि गाडी दिनांक 07 एप्रिल पासून सत्रागच्ची (कोलकत्ता) येथून दुपारी 14.45 वाजता सुटेल आणि खरगपूर, चक्रधरपूर, बिलासपुर, रायपुर, नागपूर, किनवट मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सायंकाळी 19.10 वाजता पोहोचेल.

11) गाडी संख्या 07623 नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर गुरुवार) : हि गाडी दिनांक 01 एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी 06.50 वाजता सुटेल आणि बसमत हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबुरोड, जोधपुर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 19.20 वाजता पोहोचेल.

12) गाडी संख्या 07624 श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) : हि गाडी दिनांक 03 एप्रिल पासून श्री गंगानगर येथून दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपुर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री 02.30 वाजता पोहोचेल


---- श्रीकांत देव

मुख्य संपादक, नांदेड वैभव.
Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि