सेवानिवृत्त पेशकार मधुकरराव कुलकर्णी यांचे निधन


नायगाव दि 18 - येथील प्रतिष्ठित,जेष्ठ नागरीक तथा सेवानिवृत्त पेशकार मधुकरराव गोविंदराव कुलकर्णी यांचे आज दि 18 रोजी सकाळी 7 वाजता पक्षाघाताच्या झटक्याने दुःखद निधन झाले,मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्ष होते,

आपल्या सेवा कालावधीत स्व.मधुकरराव गोविंदराव कुलकर्णी यांनी सतत कर्तव्यतत्परता व निस्वार्थी सद्भावना जपली होती त्यामुळे ते महसूल खात्यात सर्वदूर पर्यन्त सुपरिचित होते, गंगणबिडच्या प्रसिध्द श्री महादेव मंदिर प्रतिष्ठाणाच्या विकासासाठीही त्यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले,त्यांच्या सेवावृत्तीमुळे भक्तमंडळीनेही त्यांच्याबद्दल आदराची भावना कायम जोपासली होती

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे . ब्राम्हण महासंघ नायगाव तालुकाध्यक्ष गंगाप्रसाद दिवानजी ( कुलकर्णी )यांचे ते वडील होत . त्यांच्या पार्थिवावर 18 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. नायगाव येथील जुने गाव समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले,

स्व.कुलकर्णी यांच्या निधनानंतर असंख्य मान्यवरांनी सोशल मीडियावर व प्रत्यक्ष भेटीद्वारे आपल्या शोक भावना व्यक्त केल्या तसेच कुलकर्णी परिवाराचे सांत्वन केले.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि