भाजप युवा कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच संकेत कुऱ्हाडे यांचे निधन,धानोरा परिसरात तीव्र शोक संवेदना


नायगाव,दि 22- नांदेड येथील प्रथितयश उद्योजक व धानोरा ता. नायगाव येथील माजी उपसरपंच तथा नांदेडच्या छत्रपती चौकातील छत्रपती नगरचे प्रतिष्ठित रहिवासी संकेत दिगंबर पाटील कुऱ्हाडे यांचे अल्पशा आजाराने हैद्राबाद येथे आज दुपारी एक वाजता दुःखद निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय 32 वर्ष होते.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी व दोन मुले असा परिवारआहे,ते भाजपचे धडाडीचे युवा कार्यकर्ते होते.त्यांच्या पार्थिवावर रात्री 8 वा धानोरा ता नायगाव येथे अत्यन्त शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवा निवृत्त उप विभागीय अभियंता दिगंबर पाटील कुऱ्हाडे धानोरकर यांचे ते चीरंजीव होत.संकेत कुऱ्हाडे यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्व स्तरामधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि