कोलंबीचे मनमिळावू , विद्यार्थीप्रिय अध्यापक जयराम शिंगणवाड यांचे दुःखद निधन


नायगाव दि 20 - कोलंबी ता.नायगाव येथील श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विषयाचे अध्यापक , बि आर जे हाइटस सिद्धिविनायक नगर मालेगाव रोड नांदेड येथील निवासी तथा चांडोळा ता मुखेड येथील मूळ रहिवासी जयराम मारोती शिंगणवाड (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने १९ एप्रिल रोजी रात्री 9 वा हैद्राबाद येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

दिवंगत जयराम शिंगणवाड यांच्या पार्थिव देहावर २० एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या मुळगावी चांडोळा ता मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, बहिणी, मेहुणे, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सहशिक्षक जे.एम.शिंगणवाड यांच्या अकाली निधनाबद्दल कोलंबी ता.नायगाव व चांडोळा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ते यशवन्त व धर्मा शिंगणवाड यांचे बंधू तर डॉ.वैभव शिंगणवाड यांचे वडील होतं.जयराम हे माजी आ.सुभाष साबणे,विद्यमान आ.डॉ. तुषार राठोड,माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर व वेंकटराव पाटील चांडोळकर यांचे अत्यन्त विश्वासू निकटवर्तीय कार्यकर्ते होते.मनमिळाऊ स्वभावाचे व विद्यार्थप्रिय व परिसरात सुपरिचित असलेल्या जयराम शिंगणवाड यांच्या आकस्मिक,दुःखद निधनाबद्दल सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे,


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि