नायगावच्या विद्यार्थीप्रिय अध्यापिका श्रीमती साजिदा चॉईन मॅडम यांचे दुःखद निधन


नायगाव दि 21 - नायगाव येथील जनता हायस्कुल च्या हिंदी विषयाच्या अभ्यासू अध्यापिका श्रीमती साजिदा वाहिदोद्दीन चॉईन मॅडम यांचे दि 21 एप्रिल रोज बुधवार सकाळी 9 वाजता हैद्राबाद येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्या 49 वर्षाच्या होत्या

श्रीमती साजिदा वाहिदोद्दीन चॉईन मॅडम या येथील जनता विद्यालयात हिंदी विषयाच्या उत्कृष्ट शिक्षिका होत्या.त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे त्यांच्याबद्दल विद्यार्थी वर्गात अत्यन्त आदराची भावना दिसून येत होती,त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पती,दोन मुली ,एक मुलगा ,असा परिवार होता,त्यांनी आपल्या दोन अपत्त्यांना यापूर्वी डॉक्टर बनविले,तर तिसऱ्या अपत्त्याचीही त्याच मार्गावर वाटचाल सुरू असतानाच त्यांचे आकस्मिक निधन झाले, त्यांच्या निधनाने चॉईन परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.त्या पळसगाव ता नायगाव येथील शिक्षक वहिदोद्दीन चॉईन सर यांच्या सुविद्य पत्नी होत.त्यांच्या अकाली निधनामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि