सुप्रसिद्ध नृत्य कलाकार गणेश वनसागरे यांचे अकाली निधन; कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या तीव्र शोकभावना

कला क्षेत्राचा निष्ठावंत सच्च्या मनाचा,हरहुन्नरी तारा निखळला -नाट्य कलावन्त दिलीप खंडेराय


नांदेड दि 26- नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कलाक्षेत्राला धक्का देणारी घटना शुक्रवारी पहाटे नांदेड शहरात घडली आहे.शहरातील भक्ती लॉन्स च्या मागील परिसरात वास्तव्य करून असलेले प्रसिद्ध नृत्य कलाकार गणेश नागोबा वनसागरे यांचे शुक्रवारी पहाटे नांदेड येथे अकाली निधन झाले आहे.या आकस्मिक घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व कलावंतावर शोककळा पसरली असून अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

गणेश वनसागरे हे मूळ गोळेगाव ता.उमरी येथील रहिवासी असून मृत्यू समयी त्यांचे वय केवळ 45 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता वनसागरे (एसबीआय शाखा नांदेड येथे अधिकारी),एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ,तीन बहिणी,भावजयी,पुतणे भाचे असा मोठा परिवार आहे.

पारंपारिक शेती व्यवसाय परवडत नसल्याने व्यवसायाच्या निमित्ताने ते बिलोली येथे आले.तिथल्या गांधी चौक गणेश मंडळा च्या पदाधिकाऱ्यांनी वनसागरे यांच्यातील सुप्त नृत्य कलेला ओळखून त्यांना खूप प्रोत्साहन दिलं, नंतर सर्वच बिलोलीकरानी वनसागरे यांच्या कलेवर खूप प्रेम केले त्यामुळे त्यांना आपल्या अंगातील सुप्त नृत्य कला जगापुढे सादर करता आली,ते नेहमी आपल्या संवादात बिलोली करांचे अनेक वेळा जाहीर आभार मानत होते,

प्रत्येक श्वासात कला जपणारे,अत्यन्त मनमिळावू ,शांत स्वभाव आणि मेहनती कलावंत म्हणून परिचित असलेले वनसागरे यांचे अकाली निधन अनेकांच्या मनाला चटका लावणारे ठरले आहे,

आपल्या सहधर्मचारिणीला हातभार लावावा, आगळा वेगळा,सर्वसाधारण चाकोरी सोडून वेगळ्या संसाराचे उदाहरण मांडावे या उदात्त हेतूने त्यांनी स्टेट बँक इंडिया मधील दिव्यांग कर्मचारी असलेल्या मुलीशी मुद्दाम लग्न केले, नृत्यसाधने सोबतच त्यांचा आदर्श संसारही जोमाने सुरू होता,परन्तु नियतीने वेगळाच डाव साधला, भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी ही कहाणी या उक्ती प्रमाणे ते अर्ध्यावरच डाव सोडून निघून गेले,

कला क्षेत्रातील निखळ तारा गळाला

वनसागरे यांच्या निधनाने नृत्य कला क्षेत्रातील एक निखळ मनाचा तारा गळाला असून त्यांच्या निधनाने एका उभरत्या कलावंताच्या कलेला आम्ही मुकलो अशी दुःखभावना औरंगाबाद येथील टीव्ही फेम नृत्य कलावन्त दिलीप खडेराय यांनी व्यक्त केली.

ग्रामीण कलेला शहरात मानाचे स्थान मिळवून देणारा कलेचा हिरा हरवला -शाहीर दिगु तुमवाड ,

गोळेगाव ता उमरी येथे जन्माला येऊन ग्रामीण कलेला सुरुवात करीत बिलोली,नांदेड, जालना सह इतर शहरी भागात आपले कार्यक्रम करून रसिक मनावर अधिराज्य करणारा कला क्षेत्रातील कलेचा हिरा हरवला अशी प्रतिक्रिया सुजलेगाव येथील नाट्यकर्मी शाहीर दिगु तुमवाड यांनी व्यक्त केली

हरहुन्नरी कलावन्त हरवला -विजय जोशी (विभागीय सचिव)

लोककला क्षेत्रातील एक अत्यन्त हरहुन्नरी कलावन्त गणेश वनसागरे यांच्या निधनाने हरवला असे मत मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव तथा प्रतिभावन्त कलावन्त विजय जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मांडले.

जो आवडतो सर्वाला,तोची आवडे देवाला- बाळासाहेब पांडे

देवाने आमच्या जिवलग कलावंत मित्राला आमच्यातुन नेले ,हे वृत्त ऐकताच मनाला धक्काच बसला,एका हरहुन्नरी कलावंतांच्या निधनाची बातमी कळाली व मन हेलावून गेले.आजचा शुक्रवार आम्हा सर्व कलावंता साठी काळा दिवस ठरावा अशी घटना घडली , मन खिन्न झाले. . नृत्य कलेचा एक समर्पित उपासक , प्रतिभावन्त कलावन्त गणेश वनसागरे यांचे झालेले निधन म्हणजे कला क्षेत्रासाठी एक मोठे नुकसान ठरणार असून नांदेड जिल्ह्यातीलच नाहीं तर सर्व कलावन्त या कलवंतांच्या कलेला मुकले आहेत.वनसागरे परिवारावर कोसळलेल्या दुःखा मध्ये मी व माझा पांडे परिवार मांजरमकर,स्वरसंगम ग्रुप नायगाव बा.व सर्व कलावन्त सहभागी आहोत.ईश्वर त्यांना या संकटातून तरण्याची शक्ती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना अशी शोकभावना मराठवाडा कला परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी व्यक्त केली.

शाहीर बळवन्त जाधव,शाहीर सूर्यकांत शिंदे,गुरुदेव सेवा मंडळाचे साहेबराव जाधव,कीर्तनकार त्र्यंबक स्वामी,परमेश्वर केते,विकास भुरे,कलावन्त नामदेव पांचाळ,शँकर बिरादार, माधव किनाळकर,संजय देशपांडे, ज्ञानेशवर बैस,पवन गादेवार,विश्वेश्वर जोशी,मठपती सर मुखेड ,शिवदास स्वामी धर्माबाद, संदीप भुरे,अभय कुलकर्णी ,मारोती नंदें, आदींनीही वनसागरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि