ऊमद्या नेतृत्वाचा कोविड बळी; देगलूरचे लाडके व कार्यतत्पर आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन

*************************************************

खांद्याला खांदा लावून काम करणारा सच्चा सहकारी गमावला! - अशोक चव्हाण

*************************************************


नांदेड दि 09 - देगलूर बिलोली चे तरुण तडफदार आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे

कोरोनामुळे बॉम्बे हॉस्पिटल,मुंबई येथे निधन काल रात्री 10.45 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे,मृत्यूसमयी त्यांचे वय 55 होते

रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

आ.अंतापूरकर यांनी दोन वेळा देगलूर, बिलोली मतदार संघाचे प्रातिनिधीत्व केले आहे, पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे ते अत्यन्त विश्वासू सहकारी होते,त्यामुळे भविष्यात अधिक उज्वल राजकीय कारकिर्दीची त्यांना संधी होती परंतु कोविड बाधेमुळे या उमद्या नेतृत्वाचे अकाली निधन झाले,मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले आ.अंतापूरकर यांनी लोकप्रतिनिधीत्वाची संधी मिळताच वर्षानुवर्षे निःस्वार्थ भावाने जनतेची आणि समाजाची सेवा केली. विनम्र व कार्यतत्पर आमदार असा त्यांचा लौकिक होता,त्यांच्या निधनाने एक समर्पित लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने गमावला आहे, त्यांच्या निधनामुळे मातंग समाजाचेही अतोनात नुकसान झाले आहे,सुरुवातीला अंतापूरकर यांच्या निधन वार्ते बद्दल साशंकता होती,माजी मंत्री डी पी सावन्त यांनीही निधन झाले नाही,प्रकृती गंभीर आहे अशा आशयाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली होती,परंतु दुर्दैवाने त्यांच्या निधनाने वृत्त अखेर खरे ठरले व जिल्ह्यावर शोककळा पसरली,आ.अंतापूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दि 10 रोजी दु 4.00 वा. अंतिम संस्कार केले जाणार आहेत,कोविड परिस्थिती चे भान राखून गर्दी करू नये,असे आवाहन त्यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे


*************************************************

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला! - अशोक चव्हाण

नांदेड, दि. १० एप्रिल २०२१:

देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपाने मी खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा सच्चा सहकारी गमावला आहे अशी तीव्र शोक संवेदना सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

आ. अंतापूरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता व अनेकदा खडतर परिस्थितींवर यशस्वीपणे मातही केली होती. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले.

आ. रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. ते अतिशय अभ्यासू होते. देगलूरच्या विकासासाठी त्यांच्या अनेक संकल्पना होत्या व त्याअनुषंगाने ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने केवळ देगलूर नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम नेतृ्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक जिवलग सदस्य गमावल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

*************************************************

आजवर दोन आमदार कोविडचे बळी

--रावसाहेब अंतापूरकर यांच्या रूपाने महाराष्ट्राने करोना संकटात दोन आमदार गमावले आहेत. याआधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा करोनाच्या विळख्यात सापडून मृत्यू झाला होता. भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढ्यात सध्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्याच्या विधानसभेने आपला आणखी एक सदस्य या साथीत गमावला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.


---श्रीकांत देव

मुख्य संपादक, नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि