माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे निधन,नांदेडच्या राजकारणातील शक्तिमान नेता गेला


*************************************************

साहेबांच्या निधनाची बातमी कळताच वाहन चालकानेही सोडला प्राण

*************************************************

ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता गमावला- ना. चव्हाण

*************************************************

नायगाव दि 03-नांदेडच्या राजकारणातील वरिष्ठ,सिद्धहस्त नेते,माजी खासदार, माजी राज्यमंत्री गंगाधरराव मोहनराव कुंटुरकर वय ८४ यांचे दि 03 रोजी सायंकाळी औरंगाबादेत निधन झाले. करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. कुंटुर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, दोन मुलं, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शुक्रवारी मतदान झालेल्या नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे ते उमेदवार होते.

१९९६ ते १९९८ या कालावधीत ते नांदेडचे खासदार होते. १९८५ ते १९९० या काळात ते बिलोलीचे आमदार होते.

याच काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद भूषवले होते. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते अशी गंगाधरराव कुंटुरकर यांची ओळख होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पदं भूषवली.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर कुंटुरकर यांचा अनेक वर्षे प्रभाव राहिलेला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भा.ज.पा.त प्रवेश केला होता.

कुंटुरच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली होती.

त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा बँकेचे संचालक व राज्य सहकारी बँकेचे संचालक, माजी राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.कुंटुरकर यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या समाजकारणात, राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,त्यांच्या निधनाने वृत्त कळताच जिल्ह्यातील असंख्य समर्थकांत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

*************************************************

साहेबांच्या निधनाची बातमी कळताच वाहन चालकानी सोडला प्राण

--- कै. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर ह्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गाडी वर वाहन चालक म्हणून काम करणारे हैदर साहब यांचेही ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले,

*************************************************

ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता गमावला- ना. चव्हाण

----- माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. खासदार,आमदार,राज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. त्यांच्या रूपात ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता आपण गमावला, अशा शब्दांत नांदेडचे पालकमंत्री ना. अशाेकराव चव्हाण यांनी गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे पुत्र राजेश देशमुख कुंटुरकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांचे सांत्वनही केले

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि