ग्रामीण साहित्यिक प्रदिप पाटिल यांचे दुःखद निधन


नायगाव दि 10 - समाजातल्या तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी झिजवणारे व ग्रामीण भागातील व्यथा सातत्याने आपल्या लिखाणातून मांडणारे तळमळीचे पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर (वय 49) यांचे १० एप्रिल २०२१ रोजी पहाटे हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि.१० एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कामरसपल्ली ता.बिलोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामरसपल्ली ता.बिलोली येथील जेष्ठ पत्रकार तथा माजी मुख्याध्यापक प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर हे श्री. साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकर नगर येथे सन 1992 पासून शिक्षक पदावर कार्यरत होते त्यांना साहित्याची,लेखनाची आवड होती, त्यांच्या गावकळा कादंबरीत ग्रामीण परिस्थतीचे वास्तव प्रकर्षाने जाणवते, ग्राम स्वच्छता अभियानाचे योगदान या कादंबरीने समाजाला दिले.होरपळ सारखा कसदार कथासंग्रह,कवितासंग्रहाला राज्य शासनाच्या पुरस्कारासोबतच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते प्रदिप पाटील सरांचे 'गावगोठा' गावतिढा व वाळूची शेती या कादंबऱ्यां प्रकाशनाच्या वाटेवर होत्या,इतर कादंबरीचेही लिखाण चालू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील,दोन पत्नी,तीन मुले असा परिवार आहे.


"ग्रामीण कवी व साहित्यिक हरपला" - माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर

संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ग्रामीण कवी व साहित्यिक म्हणून परिचित असलेले आमच्या श्री साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकर नगर शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीप धोंडीबा पाटील यांचे अकाली निधन झाले ते आमच्या संस्थेत सन 1992 पासून कार्यरत होते त्यांना लिखाण वाचनाचा छंद होता, त्यांच्या गावकळा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता त्यांचे अध्यापन ही वाखाणण्याजोगे होते, ग्रामीण भागाची पुरेपूर जाण असलेला व ग्रामीण भागाशी नाळ जोडून असणारा कवी साहित्यिक शिक्षक हरवल्याने संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे , प्रदीप पाटील यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात खतगावकर कुटुंबीय सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


"अस्सल ग्रामीण मनाचा लेखक पत्रकार हरवला" -शिवराज पाटील होटाळकर


ग्रामीण भागातील समस्यांचे चित्रण विविध कथा कविता व पत्रकारीतेच्या माध्यमातून परखड पणे मांडणारा .अस्सल ग्रामीण मनाचा लेखक पत्रकार हरवला.अशी प्रतिक्रिया शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि