नरसीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा सक्रिय युवा पत्रकार अशोकराव सुर्यवंशी यांचे आकस्मिक दुःखद निधन


नायगाव दि 24 - नरसी ता.नायगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा सक्रिय पत्रकार अशोकराव सुर्यवंशी (वय ४०) यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचार घेत असताना शुक्रवारी (ता.२३) रात्री साडेदहा वाजता दुःखद निधन झाले.

अशोकराव सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नरसी येथे अत्यन्त शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,आई,वडील, भाऊ,बहिण,मेहुणे असा मोठा परिवार आहे.ते एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक निवृतीराव सुर्यवंशी यांचे जेष्ठ चिरंजीव होत.तंटामुक्ती अध्यक्ष व सक्रिय पत्रकारितेच्या माध्यमातून सूर्यवंशी यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय ठरले आहे,त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरातील सर्व सामाजिक स्तरामधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि