नायगावच्या चिद्रावार फॅमिली शॉप व ड्रेसेसला 40 हजार रुपये दण्ड,दुसऱ्यांदा कोविड नियमावलीचा भंग भोवला

*************************************************

नगरपंचायत व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नायगावात कोविड निर्बंधाची खुलेआम पायमल्ली

*************************************************

नायगाव दि 08 - येथील प्रतिष्ठित चिद्रावार परिवाराच्या दोन प्रतिष्ठाणाना सध्या सुरू असलेल्या कोविड निर्बंधांचा भंग केल्या बद्दल एकूण चाळीस हजारांचा दंड प्रशासनाने लावल्याची घटना घडली,संबंधित व्यावसायिकांवर यापूर्वीही एकदा दंड आकारणी झाली होती ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोना महामारी थैमान घालत आहे, दररोज अनेकजण या महामारीचे बळी ठरत आहेत,चालती बोलती माणसे काळाच्या पडद्याआड जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी शासन प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवणे सुरू आहे, परंतु मात्र नायगाव शहरातील काही दुकानदार मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत अर्धे शटर बंद करून आपले विक्री व्यवहार सुखेनैव चालवित असल्याचे दिसून येत आहे, काहीजण त्यांचा सावळा गोंधळ चालवण्यासाठी चक्क मागील दाराचाही वापर करत आहेत ,"पुढून कवाड मागून सताड" या थाटात व्यापारी मंडळी निर्बंध पालन करत असल्याचे सोंग वाढवत आहेत, नायगाव शहर व तालुक्यात आजवर कहर माजवणारी ही महामारी अशा सोंग ढोंगामुळे अधिक स्फोटक व घातक ठरणार अशी शक्यता पुढे येत आहे.

तालुक्यात वरचेवर पॉझिटीव्ह रुग्णांची आवक वाढत आहे,कोरोनाने शहरात अनेक नागरिकाचा मृत्यू झाला आहे असी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नायगाव नगरपंचायतचे संबंधित पहरेदार मात्र या मोकळ्या चाकळ्या नियमभंगा कडे अर्थपूर्ण आवेशाने सपशेल दुर्लक्ष करत असल्याची परिस्थिती अनुभवावयास मिळत आहे,जीवनावश्यक या सदराखाली अजिबात न मोडणारी कापड व इतर दुकाने सर्रासपणे चालविली जात असल्याचा आरोप अनेक जणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोजच होत आहे

*************************************************

नायगाव नगर पंचायतला मुख्याधिकारी प्रभारी, तर संबंधित कर्मचारी भलत्याच कारभारात भारी

**************************************************

नायगाव नगरपंचायत चा कारभार प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांच्याकडे आहे, त्यांच्या कडे दोन पदांचा भार असल्यामुळे त्यांना कडक कारवाईसाठी वेळ मिळत नसावा,

मुळात येथील तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार असलेले नंदकुमार भोसीकर यांना तिस-यांदा नायगाव नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन अतिरिक्त पदभार दिला आहे, स्वतःच्या मूळ विभागाचे काम सांभाळत नगरपालिकेचाही कार्यभार पूर्णपणे लक्ष घालून सांभाळण्यासाठी त्यांना वेळ न पुरने स्वाभाविक आहे, या अडचणीमुळे नायगाव शहरातील गोरगरिबांना घरकुलासह इतर कामासाठी नगर पंचायत कडे चकरा मारून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे,आणि याच अडचणीमुळे मुख्याधिकारी यांच्यानंतरचे संबंधित नगरपालिका विविध विभाग प्रमुख आपल्या मर्जीनुसार मुक्त कारभार करण्याचे स्वातंत्र्य उपभोगत असल्याचे दिसून येत आहे

*************************************************

नायगाव शहरात शासकीय आदेशानुसार लागू झालेल्या लॉकडाउनचा सध्या फज्जा उडाला असून शटर बंद दुकान चालू असा प्रकार अनेक व्यापारी चालवत आहेत, प्रामुख्याने कापड दुकानात एकाच वेळी ग्राहकांची झुंबड उडत असून या छोट्या मोठ्या दुकानातून जोमाने कोरोनाचा प्रसार होण्याची गंभीर शक्यता सतर्क नागरिकांना भेडसावत आहे.

येथील कापड दुकानासह व इतर अनावश्यक दुकानात लुटुपटू कार्यवाही करून थातुरमातुर आर्थिक तडजोड व राजकीय हस्तक्षेप या अनिष्ट युतीमुळे या दुकानांना एकतर पूर्णपणे अभय किंवा अतिशय किरकोळ दंड आकारणी अशी सुविधा नगरपालिकेचे शिलेदार पुरवताना दिसत आहेत

*************************************************

चिद्रावार यांना दुसऱ्यांदा दंड

-- नायगाव येथील प्रसिद्ध कापड

दुकानदार चीद्रावार ड्रेसेस व फ़ैमिली शॉप वर तहसीलदार गजानन शिंदे व प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी पोलीस प्रशासनाचे जवळ पास 40 कर्मचारी असा मोठा लवाजमा घेऊन अचानक सायंकाळी 4 च्या दरम्यान धाड टाकली.

दोन्ही दुकानात असंख्य ग्राहक व मुनीम,नोकर आढळूनही राजकीय दबावात व आर्थिक तडजोडीमुळे एकूण 40 हजार दण्ड आकारणी या धाडीत करण्यात आली, प्रशासनाची ही कार्यवाही म्हणजे डोंगर पोखरून केवळ उंदीर बाहेर काढण्याच्या करामती सारखा असल्याची टीका स्थानिक नागरिकातून सुरू आहे.

चीद्रावार परिवाराच्या प्रतिष्ठानांना आता पर्यंत दुसऱ्यांदा दण्ड लागला असून, इतर अनेक दुकानदार मात्र अभयपूर्ण वागणुकीमुळे अजूनही सहीसलामत असल्याचे दिसून येत आहे,तक्रारी वाढल्या की लुटुपटू कारवाई करायची व इतर वेळी रान मोकळे सोडायचे अशा प्रशासन पद्धतीमुळे शासनाचा मूळ उद्देश कुठून सफल होणार,असा संताप नागरिकातून व्यक्त होत आहे,"आम जनतेसाठी लॉक डाउन आणि अभयारण्यातील हित संबंधीयांच्या डोक्यावर खुलेआम मोकळीकीचा क्राऊन" अशा दुटप्पी प्रशासनिक व्यवहारामुळे तर आता शहरातील दुकानदार बेडर झाले आहेत, आणि यातून कोरोनाचे रुग्ण मात्र शहरात व तालुक्यात झपाट्याने वाढत आहेत.

*************************************************

दुसरीकडे नायगाव शहरात दररोज अनेक नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत,त्यातही अनेकजण अजिबात मास्क न लावता " शान के साथ" फिरतांना दिसत आहेत अशा बेजबाबदार नागरीकावरही दंडात्मक कारवाई करण्यासाठी व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नायगाव नगरपंचायतीला दुभारी व प्रभारी आधिकारी न देता कायम स्वरुपी सक्षम कारभारी द्यावा अशी मागणी नायगावकरांतुन प्रकर्षाने होत आहे.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि