मनपाच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित होणार..?

नांदेड-वाघाळा मनपाकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे 58 कोटी 26 लाख रुपये थकीत

*************************************************

नांदेड दि.१७ - गेल्या दहा महिन्यांपासून घरगुती व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकां सोबतच आता पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी वसूल करण्याकडे महावितरणने मोर्चा वळविला आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याचे 58 कोटी 26 लाख रुपये थकीत असून ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणने महापालिकेस दोन दिवसाचा अवधी दिला असल्याचे कळते.

कोरोना काळातील स्थिती लक्षात घेऊन महावितरणने एप्रिल २०२० पासून गेल्या दहा महिन्यात एकाही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला नव्हता. मात्र महावितरणच्या थकबाकीचा आकडा वरचेवर वाढतच चालला असून वीज विकत घेण्यासाठी महावितरणलाच वित्तीय संस्थांकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे. महावितरणची डबघाईस आलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने आता वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

नांदेड महापालिकेस पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी भरण्याकरिता महावितरणने 12 व 21 जानेवारी रोजी पत्राद्वारे सूचना दिली आहे,सदरील थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचीही सूचना दिली आहे. मात्र अजूनही पालिकेने थकित रकमेचा भरणा न केल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही दोन दिवसात करू असा इशारा महापालिकेला दिला आहे. महापालिकेकडे लघु दाब वर्गवारीतील पथदिव्यांचे 664 वीज कनेक्शन आहेत. या वीज जोडण्यांकडे 10 कोटी 50 लाख रुपये थकबाकी आहे. तर लघुदाब वर्गवारीतील पाणी पुरवठा योजनांचे 159 वीज कनेक्शन असून त्यांच्याकडे 85 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर उच्च दाब वर्गवारीतील पाणीपुरवठ्याच्या 15 वीज कनेक्शन कडे 46 कोटी 91 लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे थकबाकी वसुली करिता वीज पुरवठा खंडीत करण्या शिवाय महावितरण कडे पर्याय उरला नसल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई करावी लागत असल्याचे महावितरण च्या सूत्रांनी सांगितले

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि