वीज बिल माफी तर दूरच उलट खंडित पुरवठ्याचा छळ सुरू, मांजरम ३३ केव्ही उपकेंद्राला लोक वैतागले

प्रशासन बाहेर पडू देत नाही,वीज कंपनी घरात थांबू देत नाही

**************************************************


नायगाव दि 01- विज वितरण कंपनीच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत खेळखंडोबा सुरू आहे.एका तासात किमान दहा वेळा विज पुरवठा खंडित होत असून या प्रकाराने अंधाऱ्या रात्री व दिवसा उन्हातान्हात शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.शिवाय सततच्या चालू बंद खेळामुळे अनेकांची महागडी विद्युत उपकरणेही नादुरुस्त होत असल्याच्या भरपूर तक्रारी पुढे येत आहेत,याकडे एम एस इ बी च्या वरिष्ठांनी गंभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी व ग्राहकांनी केली आहे.

नायगाव तालुक्यातील मांजरम येथे विज वितरण कंपनीचे ३३केव्ही केंद्र आहे.या केंद्राच्या अंतर्गत अठरा गावे येतात.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.लाॅकडाऊन मुळे अनेकजण घरातच आहेत परंतु शेतकरी मात्र अशा उन्हातान्हात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहे.पंरतु गेल्या काही दिवसांपासून मांजरम एम एस इ बी कार्यालयात मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन नसल्याने येथील वीज केव्हा ही गुल होते व लगेच येते.या भागात विजेचा सारखा लपंडाव सुरू आहे ,विजेचा असा खेळखंडोबा सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.एका तासात किमान पाच-दहा वेळा विज जाते-येते या प्रकारामुळे विजेची घरगुती महागडी उपकरणेही जळून जात आहेत.

मार्च महीन्यात मार्च एण्डींग च्या नावाखाली वितरण कंपनीने घरगुती विज बिलाची वसुली कडकपणे केली , आणि आता लाॅकडाऊनमध्ये मात्र विजपुरवठा खंडित करण्याची समस्या लोकांसमोर उभी केली आहे.विजेचा वापर जास्त वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. पूर्वीच्या लॉक डाऊन मध्ये सरकारने दिलेल्या वचना प्रमाणे वीज बिल माफ करणे लांब च राहिले उलट वीज पुरवठयाचा खेळखंडोबा सुरू करून ग्रामीण नागरिकांचा छळ करण्याची नवीन क्लुप्ती राबवणे महावितरण कंपनीने सुरू केली आहे,

वीज पुरवठ्याच्या असल्या अनागोंदी कारभारामुळे मांजरम विभागातील प्रत्येक नागरिका वर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे घराघरातील नागरिक विजेच्या उपकरणाच्या वरच पूर्णपणे अवलंबुन आहेत या मुळे वापर जास्त, वीज जाण्याचं प्रमाण ही जास्त अशी अवस्था झाली आहे. दुसरीकडे पिकांना पाणी देतांना सुरू असलेल्या सतत अडथळ्यांना शेतकरीही प्रचंड वैतागले आहेत, शेतकऱ्यांचा राग आता अनावर होत असून शेतकर्या च्या वतीने रुमने हातात घेऊन आंदोलन करण्याची भाषा सोशल मीडिया च्या माध्यमातून तीव्रतेने व्यक्त होत आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि