"प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाकडे गांभीर्याने पहा"- उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे


नायगाव दि 17-'' प्रशासन आपल्या गावी , ह्या उपक्रमात आपल्या शंका, समस्यांचे निराकरण करून घेवून आपल्या वेळेसह व आर्थिक बचतही करून घ्यावी.या स्तुत्य उपक्रमाची नागरिकांनी आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी गांभीर्याने दखल घ्यावी असे आवाहन नायगावचे उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांनी मांजरम येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले.

दि.१६ फेब्रुवारी रोजी मांजरम येथे प्रशासन आपल्या गावी या उपक्रमांतर्गत संपूर्ण प्रशासनिक यंत्रणा उपस्थित होती.नायगाव पंचायत समितीच्या सभापती प्रभावती विठ्ठलराव कते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला, उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी प्रभाकर फाजेवाड, कौठेकर मॅडम गटशिक्षणाधिकारी, ता.कृषी अधिकारी शिंगाडे आदींच्या प्रमुख उपस्थिती सह आरोग्य विभाग, एम एस इ बी ,भूमी अभिलेख,प.स.कार्यालय चे सर्व अधीक्षक ,मांजरंम सर्कल चे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी आदी तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा या वेळी उपस्थित होती.

उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांनी यावेळी ग्रामस्थांना अत्यन्त सविस्तररित्या योजनेचे महत्व समजावून सांगितले, ते म्हणाले जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे,सर्व सामान्य लोकांच्या मनातील प्रशासना विषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत,विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी तसेच शासकीय कामकाज लोकाभिमुख करण्याचा हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.प्रत्येक शासकीय विभागाचे स्टाॅल उभे करून आपल्या तक्रारी व समस्याचे जागेवरच निवारण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, प्रत्येक महिन्याच्या दर शुक्रवारी सर्कल असलेल्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.या वेळी मांजरम विभागातील सरपंच, उपसरपंच, यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती.

*************************************************

*************************************************

कार्यक्रमाची फलश्रुती - "पांदण रस्त्याचे तात्काळ झाले उदघाटन"

मांजरम -ते गोदमगाव व मांजरंम ते अंचोली या पांदन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांच्या हस्ते दि 16 फेबुरवारी रोज मंगळवारी दुपारी करण्यात आले.या वेळी तहसीलदार गजानन शिंदे,सभापती प्रभावती विठलं कत्ते ता कृषी अधिकारी शिंगाडे साहेब ,मंडळ अधिकारी पांडे साहेब, मनरेगा जे इ शेख साहेब,सरपंच प्रतिनिधी निळकंठमाली पाटील,उपसरपंच प्र.हणमंत शिंदे,पत्रकार बाळासाहेब पांडे,माजी उपसरपंच वेकट केते, पांदण रस्त्यावरील शेतकरी व शेत मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*************************************************

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि