रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी! ना. अशोक चव्हाण यांच्याशी विचारविनिमय


मुंबई, दि. १- नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट शौकिनांसाठी एक खुशखबर पुढे येत आहे,प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी हे दोघेजण नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक असून, यासंदर्भात कुलकर्णी यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची परवानगी घेतली व विचारविनिमय केला .

सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व 'क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर ना. चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. या दिग्गज क्रिकेटपटू च्या संकल्पनेचे पालकमंत्र्यांनी दिलखुलास पणे स्वागत केले असून ही योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही ना.चव्हाण यांनी दिली,नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून ना. अशोक चव्हाण यांना एक टी-शर्टची भेट दिली. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.नांदेड च्या पालकमंत्र्यांनी या संकल्पनेबद्दल दाखवलेल्या आस्थेमुळे आपले काम अधिक सोपे झाल्याची भावना कुलकर्णी यांनी बोलून दाखवली


---श्रीकांत देव

मुख्य संपादक,नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि