जनता "लॉकडाउनच्या" खाईत..लोकप्रतिनिधी मात्र जिल्हा बँकेच्या लगीनघाईत... !!

लॉकडाउन विरोधात जिल्ह्यातील लघू व्यावसायिकात तीव्र निषेधाची लाट


नायगाव दि 30- राज्याची आर्थीक राजधानी मुंबई,पुणे,नागपुर व ठाणे यासह राज्याच्या अनेक मेट्रो सिटीत कोरोना महामारीचा मोठा कहर सुरू आहे आणि नांदेडचा याबाबतीत सातवा क्रमांक असुनही मायबाप जिल्हा प्रशासनाने आठ दिवसापुर्वीच नांदेड जिल्हा "लॉकडाउनच्या" खाईत लोटला आहे, तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुक लगीनघाईत मग्न आहेत. त्यामुळे सामान्य जनतेत तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

मुंबई,पुणे,नागपुर,ठाणे येथे लोकल मेट्रो बसेस सह सर्व सेवा सुरू आहेत, व्यापारपेठा सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे वरिष्ठ सनदी अधिकारी नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे यांनी राज्याला आता दुसर्‍यांदा पुर्णतः लॉकडाउन परवडणारे नाही तर जनतेला मास्क,सॅनीटायझरचा वेळोवेळी वापर अन् सुरक्षीत अंतर या त्रिसुत्रीचा वापर करण्याबाबत कडक उपाययोजना व कोरोना रोग रोखण्यासाठी आरोग्य सुविधासह अन्य ऊपाय योजनेवर भर देणे गरजेचे असल्याचे मत नुकतेच प्रसार माध्यमातुन केले आहे.


लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे छोट्या व्यावसायिकांची ससेहोलपट--लघू व्यावसायिक राजीव गंदिगुडे, नरसी


जिल्हाधिकारी डॉ. बिपीनजी इटनकर यांनी आठ दिवसापुर्वीच राज्यात मोठ्या कोरोना उपद्रव बाधित शहरात कुठेही नसताना नांदेडला लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळहातावर पोट असणारे श्रमीक, अन् व्याजाने पैसा काढुन लहान सहान ऊद्योग करणारा व्यापारी रोजीरोटीसाठी त्रस्त झाला आहे, सततच्या लॉकडाउनमुळे मार्केटमधील व्यापारीवर्गाचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. बँका तथा खाजगी कर्जाच्या ओझ्याखाली हा वर्ग पुरता दबुन गेला आहे.असे मत नरसी येथील हॉटेल व्यवसायीक राजीव गंदिगुडे यांनी व्यक्त केले. गोर गरीब व्यावसायिका साठी रोजच्या व्यवहाराचे चाक फिरले तरच उपजीविका सुरळीतपणे चालते ,अनेक छोट्या व्यावसायिकांचे बँकेचे हप्ते थकले आहेत, दुकानभाडे,लाईटबिल व नौकरदाराचे पगार थकले आहेत,व्यवसाय बंद करून घरीच राहील्यामुळे खाण्याचे वांधे होत आहेत, आमचे दुःख ऐकुन घेण्यास कुणालाही वेळ नाही, आम्ही लहान व्यावसाईक या लॉक डाउन मुळे उद्विग्न व हतबल झालो आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

एक-दोन नौकर ठेउन कोरोनाचे घालुन दिलेले निर्बंध कटाक्षाने पाळत पोटाची खळगी भरुन घेणार्‍यावर कडक निर्बंध अन् शेकडो लेबर लाऊन त्यांना एकाच खोलीत कोंडून सर्व निर्बंध पायदळी तुडवणार्‍या मोठ्या उद्योगपतीचे कारखाने चालु? हि कोणती विषमता?अशा तीव्र भावना या लॉकडाउन पिडीत लहान व्यवसायिक वर्गातून व्यक्त होत आहे.

आता जगाने कोरोना सोबत स्वतःची स्वतःच काळजी घेत जगायला शिकले पाहीजे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा केले आहे तरी सुद्धा जिल्हा प्रशासन ऊठसुट लॉकडाउन लावत आहे. एअरकंडीशन मध्ये बसुन गोरगरीबांची पर्वा न करता नियम लादले जात आहेत, ८५% असे लोक ज्यांना दररोज मेहनत केल्याशिवाय प्रपंच चालवता नाही अशांनाच वेळोवेळी त्रास का? अशी या पिडीत वर्गाची जनभावना तीव्रतेने व्यक्त होत आहे.

महामानव डॉ बाबासाहेब अांबेडकर यांनी दिनदुबळ्या समाजाला सन्मानाने जगण्यासाठी मानवअधिकार कायदा केला आहे. त्याचा प्रशासनाने विसर पडू देउ नये असे विचार गंदिगुडे यांनी व्यक्त केले.

मानव अधिकार कायद्याद्वारे स्वकष्टावर जगणार्‍या मजुर, श्रमिक, मुनीम, हातगाडीवाले, रिक्षावाले, ड्रायव्हर, हातगाडीवर वेगवेगळा धंदा करणारे ,भाजीपाला, फळविक्रेते, मिठाईवाले, हॉटेलवाले विविध लहान व्यावसाईक यांना जगण्यासाठी आधी तरतूद करावी, कुटुंबाचे पोटभरण्याएवढी रक्कम दरमहा उपलब्ध करुन द्यावी, मागील वर्षी लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसान भरपाईची तरतुद करावी आणी खुषाल लॉकडाउन करावे अशी मागणी गंदिगुडे यांनी केली आहे.

---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि