लॉक डाउन निर्णयाविरुद्ध नायगावकरांचा उग्र पवित्रा,रास्ता रोको सह नियमावली जाळून तीव्र निषेध


नायगाव दि 24 - कोरोना -2 लाटेमुळे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी लॉक डाउनचा आदेश लागू केल्यानंतर नायगाव येथे मात्र अनेक जणांनी या निर्णयाविरुद्ध संतप्त पवित्रा घेत लॉक डाऊन नियमावलीची जाहीर होळी केली..नायगावच्या भूमिपुत्रांनी लॉक डाऊनच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून नांदेड - हैदराबाद रस्ता रोखला,जिल्हा प्रशासनाच्या तीव्र निषेध करत प्रचंड घोषणा बाजीही केली.जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या,या प्रकाराने जनतेतही आचंबा निर्माण झाला.

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,हिंद युवा परिषदेचे संयोजक रणजित देशमुख, युवा नेते गजानन पा. चव्हाण, राष्ट्रवादीचे निळंकंठ ताकबीडकर, शिवाजी पा. गायकवाड,राजेश वाघमारे वंजारवाडीकर व शेतकरी, शेतमजूर, महिला, व्यापारी कामगार यावेळी उपस्थित होते.

हा प्रकार कळताच पो.नि.आर. एस. पडवळ ,सपोनि भीमराव कांबळे यांनी पोलिसांचा ताफा घेऊन येऊन तात्काळ रस्ता मोकळा केला पण आंदोलन कर्ते पसार झाल्यामुळे प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे कळले


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि