सोशल मिडीया चर्चेचा असाही विधायक फायदा..नायगाव शहरात लोकसहभागातून उभारले जात आहे कोविड केअर सेंटर

*************************************************

सामाजिक जाणिवेतून संपूर्ण जिल्ह्यातुन प्रथमच आकारात येत असलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

*************************************************

नायगाव दि 23- नायगावच्या स्थानिक सोशल मिडीयातून सातत्याने घडत आलेल्या चर्चेचा विधायक फायदा पुढे आला असून नायगावच्या एका ठळक ग्रुप मध्ये घडून आलेल्या चर्चेनंतर थेट सदस्यांची बैठकच बोलावली गेली व उत्स्फूर्तपणे लोकसहभागासाठी प्रतिसादही मिळाला आणि घडलेली चर्चा केवळ चॅटिंग न राहता तिचे रूपांतर एक विधायक लोकहीतकारी उपक्रम साकारण्यात झाले आहे,

केवळ सोशल मीडियावरच्या चर्चेची स्वागतार्ह निष्पत्ती म्हणून नायगाव शहरात आज दि 24 एप्रिलपासून सार्वजनिक कोविड सेंटर सुरू होत आहे,

ग्रुपवर चर्चा झाली,सर्वांनी मनावर घेतले,सर्वांची संवेदना जागी झाली, तात्काळ सदस्यांची बैठकीही घडून आली,निव्वळ वायफळ गप्पा न मारता नायगावकरांनी विचारात घेतलेल्या कोविड केअर सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला केवळ ४८ तासात प्रशासकीय परवानगीही मिळवून घेतली, सामाजिक दायित्व जपणाऱ्या दानशुरांच्या सहयोगातून सध्याच्या परिस्थितीत एखाद्या वरदानासारखे ठरणारे कोविड केअर सेंटर आकारात आले,आज या लोकसहभागातून साकारलेल्या कोविड केअर सेंटरचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष वसंतराव पा.चव्हाण यांच्या हस्ते चक्क उद्घाटनही होत आहे.

कोरोनाची दुसरी लाट खूप भयानक असल्याचा अनुभव सर्वत्र येत असल्याने सर्व स्तरामधील नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, एकीकडे विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही तर दुसरीकडे नवीन बाधितांचे दररोजचे आकडे बघून भोवळ येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना शासकीय व खाजगी रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले आहे. या संकटमय परिस्थितीची चर्चा "आवाज नायगावचा" या ग्रुप वर घडून आली, या ग्रुपमध्ये अनेक मान्यवर व्यापारी , ठळक राजकीय व्यक्ती,खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर व पत्रकार बांधवांचे सदस्यत्व आहे. या सर्वांनी शासनाच्या आदेशाची किंवा निधीची वाट न बघता दररोज या भयंकर महामारीमुळे बळी पडणारे रुग्ण वाचवण्यासाठी लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्याची संपल्पना मांडल्या गेली.

या संकल्पनेला ग्रुपवरील सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला,नुसता प्रतिसादच नव्हे तर अनेकांनी आपल्या मदतीची तयारीही दाखवली. सामाजिक दायित्वातून आरोग्य सेवेचा वसा चालवणारे डॉ विश्वास चव्हाण आणि डॉ. मधुसूदन दिग्रसकर यांचे वैद्यकीय अनुभवपूर्ण सहकार्य, व पत्रकार तथा ग्रुप ऍडमिन नागेश कल्याण , नगर सेवक पांडुरंग चव्हाण यांनी नायगावकरांसाठी उपयोगी ठरू शकणारे सार्वजनिक कोविड सेंटर उभारणीच्या संकल्पनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांचा भावनिक सहभाग, इच्छा शक्ती, निधी संकलनासाठी योगदान अशा सकारात्मक सहभागामुळे हा निर्णय प्रत्यक्ष साकारला आहे.

*************************************************

मा.आ.वसंत पा.चव्हाणांनी सामाजिक दायित्व जोपासून सिद्ध केली आत्मिक संवेदना

*************************************************

सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून माजी आ. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा.चव्हाण यांनी ग्रुप वरील चर्चे दरम्यान पुढे आलेल्या अडचणीचे लगेच निराकरण करून या संकल्पनेला सक्रिय प्रोत्साहन दिले,जागेचा प्रश्न पुढे येताच आपली लिटल स्टेप इंग्लिश स्कुल ही शाळा या सेंटर साठी देऊ केली, बाकी सुविधाही या कोविड सेंटरला उपलब्ध करूण्याचे त्यांनी तत्काळ औदार्य दाखवले, यामुळे अत्यंत कमी कालावधीत निव्वळ लोकेच्छेतून हे कोविड केअर सेंटर उभारने शक्य झाले आहे.वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या जाणत्या मातब्बर नेत्याचे प्रोत्साहन व योगदान मिळाल्यामुळे ही लोकहीतकारी संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आली आहे

*************************************************

नायगाव येथे साकारत असलेल्या या कोविड केअर सेंटर साठी सामाजिक जाणिवेतून श्रीनिवास पाटील चव्हाण , प्रदीप पाटिल कल्याण, पांडू पा चव्हाण,नागेश कल्याण ,प्रा. यादवराव पा. शिंदे, साईनाथ मेडेवार, सुधाकर जवादवार, धनराज शिरोळे, गणेश नायगावकर, माणिक चव्हाण, प्रताप कदम, बालाजी शिंदे, संजय चव्हाण, कैलास रामदिनवार, सुमित कल्याण, साईनाथ चव्हाण, आशिष ममिडवार, विठ्ठल बेळगे, आदींनीही पुढाकार घेऊन सर्वांसाठी आदर्श उदाहरण ठरू शकणारे "साई माऊली सार्वजनिक कोविड केअर सेंटर" जनसेवेत रुजू केले आहे.

या संकल्पने साठी घडून आलेल्या चर्चेत ज्यांचा सहभाग नव्हता अशा अनेक संवेदनशील प्रतिष्ठित सहृदय नागरिकांनी सदर उपक्रमाची माहिती कळताच प्रत्यक्ष फोन करुन किंवा मेसेज पाठवून आपापल्या परीने जास्तीत जास्त योगदान देण्याचीही तयारी दर्शवली आहे. या शुभ संकल्पाला मिळालेला उदंड आणि सकारात्मक प्रतिसाद लोकसहभाग पाहता या वैश्विक महामारीचा मुकाबला करण्यासाठी असे उपक्रम अत्यन्त उपयोगी ठरणार हे सिद्ध झाले आहे. संकट काळात नायगावकरांनी एकत्र येऊन सामाजिक जाणिवेतून उभारलेले कोविड केअर सेंटर इतरांसाठीही आदर्श ठरणार आहे यात शंकाच नाही

*************************************************

केवळ ४८ तासात प्रशासकीय मान्यता..

*************************************************

डॉ. विश्वास चव्हाण यांच्या पुढाकारातून माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला लागणारी प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जि.प.शिक्षण आरोग्य सभापती संजय बेळगे, उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण, श्रीनिवास पा. चव्हाण, युवा नेते प्रा. रवींद्र पा.चव्हाण, प्रदीप पाटील कल्याण यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून केवळ ४८ तासातच या कोविड केअर सेंटरला प्रशासकीय मान्यता मिळू शकली आहे. सर्व मान्यवरांच्या या संवेदनशीलते बद्दल नायगाव शहरवासी व तालुक्यातील जनतेतुन कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे

*************************************************


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि