बरबड्यातील कु. पूजा गंगाधर भुसलवाड ची भारतीय सैन्यात आसाम रायफल्स पदी निवड

===================================

ग्रामीण महिला शक्तीचा उल्लेखनीय अविष्कार

===================================

नायगाव दि 28- तालुक्यातील बरबडा येथील कन्या व जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु.पूजा गंगाधर भूसलवाड हीची इंडीयन आर्मी मध्ये निवड झाली आहे, तिने बरबड्यातील पहिली महिला सैनिक ठरण्याचा मान पटकावला आहे,

अत्यंत गरीब कुटुंबात पूजाचा जन्म झाला असून प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत आपल्या आई वडिलांचे स्वप्न तिने निश्चयाने साकार केले आहे,कु पूजा हिच्या या दैदिप्यमान यशामुळे बरबड्याचा तसेच नायगाव तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. कु पूजा हीने इयत्ता 5 वी ते 12 पर्यंतचे शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथे पूर्ण केले 12 ला तिने विज्ञान शाखेत चांगल्या प्रकारे यश संपादन करून पुढील शिक्षण याच महाविद्यालयातुन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे बी ए ची पदवी मिळवली, 2018 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा तिने दृढ निश्चय केला होता, आणि तिने हे यश अखेर खेचून आणलं. यावेळी तिचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देतांना तिने स्पर्धेच्या युगात वावरत असताना कोणीही आपला आत्मविश्वास कधीच गमावू नये व स्वतःला कधीच कमी समजू नये असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या शाळेकडून व आदरणीय शिक्षकवृंद, गावकऱ्यांकडून होत असलेल्या कौतुकामुळे यशाचा आनंद द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया दिली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर, सचिव नारायणराव सर्जे सर, संचालक शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर, देविदासराव नेरल्लेवाड, शाळेचे उपमुख्याध्यापक अक्कलवाड सर, शिंदे सर , पूजा भूसलवाडचे‌ वडील गंगाधराव भूसलवाड, शाळेतील शिक्षक,शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराव धर्माधिकारी यांनी केले तर सूत्र संचालन एन टी सर बरबडेकर यांनी केले तर संपुर्ण उपस्थितांचे आभार अक्कलवाड एन के यांनी मानले.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकरRecent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि